पुणे : महापालिकेच्या अधिकच्या पाणीवापराबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीस महापालिकेकडून अधिकारी किंवा पालिकेचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही; परंतु यापुढील सुनावणी येत्या २५ मार्च रोजी होणार आहे.पुणे महापालिकेकडून उचलल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्यावर आक्षेप घेत, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिका दाखल करून पुणे महानगरपालिका व जलसंपदा विभागाला बाजू मांडण्यासाठी नोटीसही बजावली. जलसंपदा विभागाचे अधिकारी न्यायालयात सुनावणीस हजर होते; मात्र महापालिकेकडून कोणीही उपस्थित नव्हते. शेतीचे पाणी शहराला दिले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. महापालिकेकडून अधिकचे पाणी वापरल्यामुळे होणाºया शेतीची नुकसानभरपाई मिळावी, अशी याचिका दाखल करण्यात आली असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड. शकुंतला वाडेकर यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या पाण्यावर २५ मार्चला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:56 AM