शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
5
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
6
900% पर्यंत खटा-खट परताना देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
7
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
8
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
9
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
10
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
11
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
12
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
13
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
14
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
15
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
16
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
17
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
18
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
19
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
20
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

पुणे पेशवाजचा तिसरा विजय

By admin | Published: July 24, 2016 1:50 AM

यजमान पुणे पेशवाजने शनिवारी हैदराबाद स्काय संघावर १०९-९९ने मात करीत प्रो बास्केटबॉल लीगमधील तिसऱ्या विजयाची नोंद केली.

पुणे : यजमान पुणे पेशवाजने शनिवारी हैदराबाद स्काय संघावर १०९-९९ने मात करीत प्रो बास्केटबॉल लीगमधील तिसऱ्या विजयाची नोंद केली. स्टार खेळाडू सिद्धांत शिंदेच्या अनुपस्थितीत पुण्याने आत्मविश्वास वाढविणाऱ्या विजयाची नोंद केली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये २७-२२ अशी आघाडी घेत, यजमान संघाने सुरेख प्रारंभ केला. दोन्ही संघ हे या पूर्वीच प्ले-आॅफसाठी पात्र ठरलेले असल्याने सामन्यामध्ये अनेक प्रयोग पाहायला मिळाले. नरेंदर ग्रेवाल आणि अजिंक्य माने या दोघांनीही आज भन्नाट खेळ केला. हैदराबाद स्कायकडून थॉमसने पुण्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुण्याचे खेळाडू त्याला पुरून उरले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये हैदराबादने सामन्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मध्यांतराला ४ मिनिटे शिल्लक असताना, महिपाल व महेश यांनी हैदराबादला ३९-३८ अशी अल्प आघाडी मिळवून दिली होती. मात्र, पुण्याच्या खेळाडूंनी ‘काउंटर अटॅक’ मध्यंतराला ५३-५२ अशी आघाडी घेतली. पुण्याने रिबाउंडमधून २१, तर टर्नओव्हरमधून २१ गुणांची कमाई केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये हैदराबादच्या खेळाडूंनी मुसंडी मारत ७९-७७ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये शेवटच्या क्वॉर्टरमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ करीत आपला क्लास दाखवून दिला. सामना संपण्यास २ मिनिटे शिल्लक असताना अजिंक्य व नरेंदर यांनी पुण्याला १० गुणांची आघाडी मिळवून दिली. ती भरून काढणे हैदराबादला शक्य झाले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)सलग तिसऱ्या लढतीत गुणांचे शतकरविवारी (दि. २४) प्ले-आॅफमध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्याआधी दोन्ही संघांना आपली क्षमता जाणून घेण्याची चांगली संधी होती. पुणे संघाने प्ले-आॅफसाठी आपली सज्जता सिद्ध करताना, सलग तिसऱ्या सामन्यामध्ये शंभरपेक्षा अधिक गुणांची कमाई केली. हैदराबाद स्काय व पुणे पेशवाज यांच्यातील विजयी संघ चेन्नई स्लॅमशी भिडणार आहे.निकाल : पुणे पेशवाज : १०९ ( नरेंदर ग्रेवाल २७, अजिंक्य माने १६, अर्जुन मेहता १४) विवि हैदराबाद स्काय : ९९ (महिपालसिंग २६, महेश २०, मनू थॉमस १७).