शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पुणेकरांनी बुल्सला सहज लोळवले

By admin | Published: February 28, 2016 1:00 AM

कर्णधार मनजीत चिल्लरचा तुफानी अष्टपैलू खेळ आणि अजय ठाकूरच्या खोलवर चढाया या जोरावर पुणेरी पलटनने बंगळुरू बुल्सला ४४-२७ अशी धडक दिली. या शानदार विजयासह

- रोहित नाईक,  नवी दिल्लीकर्णधार मनजीत चिल्लरचा तुफानी अष्टपैलू खेळ आणि अजय ठाकूरच्या खोलवर चढाया या जोरावर पुणेरी पलटनने बंगळुरू बुल्सला ४४-२७ अशी धडक दिली. या शानदार विजयासह पुणेकरांनी प्रो कबड्डीमध्ये यंदाच्या सत्रात गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे बंगळुरू बुल्सचा हा सलग नववा पराभव ठरला.त्यागराज क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सामन्यात आक्रमक सुरुवात केलेल्या पुणेकरांना बंगळुरूने चांगलेच झुंजवले. ९व्याच मिनिटाला त्यांनी पुण्यावर पहिला लोण चढवताना ७-४अशी आघाडी घेतली. मात्र, यानंतर पुणेकरांनी मागे वळून बघितले नाही. नेहमीप्रमाणे सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना मनजीतने बंगळुरूच्या क्षेत्रात जोरादर मुसंडी मारली. अजय ठाकूरनेदेखील त्याला उपयुक्त साथ देताना बंगळुरूचा बचाव खिळखिळा केला. १६व्या मिनिटाला बंगळुरूवर पहिला लोण चढवून मध्यंतराला पुणेरी पलटनने १९-१३ अशी आघाडी मिळवली.यानंतरही पुणेकरांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवून बंगळुरूवर आणखी २ लोण चढवले. यावेळी अजय ठाकूरने निर्णायक चढाई केल्या. पहिल्या डावात सुपर रेड केल्यानंतर दुसऱ्या डावातही सुपर रेड करताना एकाचवेळी तब्बल ४ गडी मारले आणि संघाला २८-२१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या बाजूने सुरेंद्र सिंग व दीपक हूडाने देखील आक्रमणात मोलाचे योगदान दिले.पराभूत बंगळुरू बुल्सचा हा एकूण ११ वा पराभव असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यात दीपक कुमारने एकाकी लढत देताना ७ गुणांची कमाई केली. आशिष शिगवण व पवन कुमारने अष्टपैलू खेळ करताना प्रत्येकी ४ गुण मिळवले.