शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

पुणेकरांनी पुन्हा नमवले

By admin | Published: April 24, 2017 11:38 PM

मुंबईला दिलेल्या 161 धावांच्या माफक आव्हानाचा बचाव करताना पुण्याच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात टिच्चून मारा करत करत मुंबईचा 3 धावांनी पराभव केला.

रोहित नाईक /ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतरही फलंदाजांनी ऐनवेळी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सचा विजयी अश्वमेध अखेर रोखला गेला. जयदेव उनाडकटने शेवटच्या षटकात घेतलेले महत्त्वपूर्ण बळी आणि बेन स्टोक्सचा अचूक मारा यांमुळे रायझिंग पुणे सुपरजायंटने ३ धावांनी बाजी मारत यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा मुंबईला नमवले. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा हा केवळ दुसराच पराभव असून दोन्ही पराभव त्यांनी पुण्याविरुद्धच पत्करले. तसेच, यासह मेंटॉर सचिन तेंडुलकरला वाढदिवसानिमित्त विजयाची भेट देण्याचे मुंबईचे स्वप्नही धुळीस मिळाले.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात १६१ धावांचा पाठलाग करताना मुंबईकर सुरुवातीपासूनच अडखळताना दिसले. खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे जात असलेला कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केल्यानंतरही इतर फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला. पार्थिव पटेल - जोस बटलर या जोडीने नेहमीप्रमाणे आक्रमक सलामी दिली. परंतु, बटलर आक्रमकतेच्या नादात बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली. मुंबईला ८ बाद १५७ धावांवर रोखून पुण्याने बाजी मारली. बेन स्टोक्सने टिच्चून मारा करत मुंबईकरांना जखडून ठेवले. त्याने एक षटक निर्धाव टाकून २१ धावांत २ बळी घेतले. तसेच, सुरुवातीला धावांची खैरात केलेल्या जयदेव उनाडकटने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये अचूक मारा करुन मोक्याच्या वेळी २ बळी घेत मुंबईकरांचे कंबरडे मोडले. रोहित व्यतिरिक्त पार्थिवने (३३) चांगली फटकेबाजी केली. परंतु, संघाला विजयी करण्यात दोघेही अपयशी ठरले. बटलर, नितीश राणा, केरॉन पोलार्ड व हार्दिक पंड्या अपयशी ठरल्याचा मुंबईला फटका बसला.तत्पूर्वी, पुण्याने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६० धावांची मजल मारली. अजिंक्य रहाणे - राहुल त्रिपाठी यांनी मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही दाद न देता दमदार अर्धशतकी सलामी दिली. मिशेल जॉन्सन, मिशेल मॅक्लेनघन, यंदा पहिलाच सामना खेळत असलेला कर्ण शर्मा, हुकमी जसप्रीत बुमराह व हरभजनसिंग असे सर्वजण धावा रोखण्यात अपयशी ठरत होते. परंतु, अखेर कर्ण शर्मानेच मुंबईला यश मिळवून देत धोकादायक रहाणेला (३८) बाद केले. यानंतर राहुल त्रिपाठीने सूत्रे आपल्याकडे घेत ३१ चेंडूंत ४५ धावा काढल्या. मात्र, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१७), गतसामन्यात निर्णायक फटकेबाजी करणारा महेंद्रसिंह धोनी (७), अष्टपैलू बेन स्टोक्स (१७) अपयशी ठरल्याने पुण्याची धावसंख्या मर्यादित राहिली. हरभजनने स्मिथचा त्रिफळा उडवून आयपीएल कारकिर्दीतील आपला २०० वा बळी मिळवला. अखेरच्या काही चेंडंूत मनोज तिवारीने (२२) केलेल्या फटकेबाजीमुळे पुण्याला समाधानकारक मजल मारता आली. कर्ण शर्मा व बुमराह यांनी प्रत्येकी दोन, तर जॉन्सन व हरभजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. संक्षिप्त धावफलक :रायझिंग पुणे सुपरजायंट : २० षटकांत ६ बाद १६० धावा (राहुल त्रिपाठी ४५, अजिंक्य रहाणे ३८; जसप्रीत बुमराह २/२९, कर्ण शर्मा २/३९) वि. वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १५७ धावा (रोहित शर्मा ५८, पार्थिव पटेल ३३; बेन स्टोक्स २/२१, जयदेव उनाडकट २/४०.)