शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पुणेकरांची दिल्लीस्वारी

By admin | Published: February 21, 2016 12:45 AM

पुणेरी पलटणने नियोजनबद्ध खेळ करताना अडखळणाऱ्या दबंग दिल्लीचा यंदाच्या प्रो-कबड्डी लीगमध्ये दुसऱ्यांदा पाडाव करून ३२-२२ असा विजय मिळवला. या शानदार विजयासह पुणेकरांनी

- रोहित नाईक,  जयपूरपुणेरी पलटणने नियोजनबद्ध खेळ करताना अडखळणाऱ्या दबंग दिल्लीचा यंदाच्या प्रो-कबड्डी लीगमध्ये दुसऱ्यांदा पाडाव करून ३२-२२ असा विजय मिळवला. या शानदार विजयासह पुणेकरांनी गुणतक्त्यात २७ गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली आहे, तर गतसामन्यात बंगळुरू बुल्सला नमवून यंदा पहिला विजय मिळवलेल्या दिल्लीने पुन्हा एकदा निराशा केली. सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पुणेकरांनी सावध सुरुवात करताना दिल्लीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीनेदेखील बचावावर भर देत सामन्यास संथ सुरुवात केली. मध्यंतराच्या काही मिनिटांपूर्वीच पुणेकरांनी दिल्लीवर लोण चढवताना १६-७ अशी मजबूत आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले. या वेळी पुणेकर सहज बाजी मारणार, असे चित्र होते. मात्र दिल्लीकरांनी झुंजार खेळ करताना सामन्यात पुनरागमाचे संकेत दिले.संदीप धूल आणि कर्णधार रविंदर पहल यांनी केलेल्या दमदार पकडीच्या जोरावर पुण्याच्या आक्रमकांना रोखताना पुनरागमन केले. मात्र अतिआक्रमकपणाच्या नादात चुका झाल्याने पुण्याने पुन्हा एकदा आघाडी वाढवून वर्चस्व मिळवले. त्यातच अखेरच्या मिनिटामध्ये पुणेकरांनी पुन्हा एकदा दिल्लीला लोण चढवताना विजयावर शिक्कामोर्तब केले.