शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पुण्याचा स्वप्नील शेलार, उपनगरचा सचिन पाटील यांनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:52 AM

महाराष्ट्र केसरीच्या थरारास प्रारंभ : राज्यभरातून ९०० पहिलवानांचा सहभाग

जयंत कुलकर्णी 

जालना : आझाद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा स्वप्नील शेलार, मुंबई उपनगरचा सचिन पाटील, कोल्हापूरचा भरत पाटील, लातूरचा दत्ता भोसले यांनी गादी गटातील ५७ किलो वजन गटात तिसरी फेरी गाठली आहे.७९ किलो वजनाच्या गादी गटात नांदेडचा सोमनाथ कोरके, मुंबईच्या अभिषेक तुर्केवाडकर, हिंगोलीचा भानुदास जाधव, रायगडचा रुपेश पावसे, अहमदनगर शहरचा अब्दुल शोएब, उस्मानाबादचा किरण जवळगे, पुणे जिल्ह्याचा अभय चोरगे यांनी तिसरी फेरी गाठली आहे.बुधवारी दुपारी ४.३० वाजता ७९ व ५७ किलो वजनाच्या माती व गादी गटातील कुस्त्या रंगल्या. जबरदस्त चैतन्यपूर्ण वातावरणात सुरु झालेल्या या स्पर्धेला बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात झाली. या वेळी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, विलास कथुरे, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, जालना जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, सरचिटणीस दयानंद भक्त, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, आदींची उपस्थिती होती. राज्यभरातून ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले.यांच्यात असणार महाराष्ट्र केसरी किताबासाठी चुरसप्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची प्रतिष्ठेची गदा मिळवण्यासाठी प्रत्येक पहिलवान उत्सुक आहे. गतवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा पुणे येथील अभिजीत कटके यावेळेसही आखड्यात उतरत आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राहुल आवारेचा भाऊ गोकूळ आवारे हादेखील विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.या दोघांशिवाय सोलापूरचा गणेश जगताप, सोलापूरचा माऊली जमदाडे, कोल्हापूरचा कौतुक ढापके, नाशिकचा हर्षल सदगीर, कोल्हापूरचा बाळा रफिक शेख, जालना येथील अक्षय शिंदे, अहमदनगरचा विष्णू खोसे हे पहिलवान महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.विशेषत: गतवर्षीचा ‘महाराष्ट्र केसरी’ पै.अभिजित कटके याच्यावर सर्व कुस्तीप्रेमींचे लक्ष असणार आहे. पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिजीतने दोन वेळा ह्यमहाराष्ट्र केसरीह्णच्या अंतिम फेरीत धडक मारली होती व गतवर्षी किरण भगत वर मात करत त्याने प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती. त्याला शिवराज राक्षे, बीडचा अक्षय शिंदे, नगरचा विष्णू खोसे, कोल्हापूरचा कौतुक डाफळे, महेश वरुटे, बालारफीक शेख, गणेश जगताप आणि हर्षवर्धन सदगीर यांच्याकडून अभिजीतला तगडा आव्हान मिळू शकते.७९ किलो (माती गट - पहिली फेरी) : कृष्णकांत कांबळे (कोल्हापूर) वि. वि. मोईन सय्यद (जालना), आदेश चौधरी (ठाणे जि.) वि. वि. सिद्धेश पाटील (रायगड), किरण बककुडे (सातारा) वि. वि. निखील उंद्रे (पुणे), (मुंबई) वि. वि. विशाल मिश्रा (अकोला), अजित शेळके (अहमदनगर) वि. वि. अजयकुमार यादव (मुंबई).५७ किलो (गादी गट : दुसरी फेरी) : भोलानाथ साळवी (कल्याण) वि.वि. सूरज ढेरगे (बीड), भरत पाटील (कोल्हापूर) वि.वि. भालचंद्र कुंभार (पुणे शहर), ज्योतीबा अटकळे (सोलापूर) वि.वि. दर्शन निकम (धुळे), अमोल फितवे (अकोला) वि.वि. कार्तिक शेलार (मुं. उपनगर).५७ किलो (माती) : अक्षय भोईर (कल्याण) वि. वि. प्रवीण गोडसे (सातारा), हरी अंबेकर (नाशिक) वि. वि. अक्षय गिरी (वाशिम), संतोष हिरगुडे (कोल्हापूर शहर) वि. वि. श्रीनाथ पाटील (रायगड).कुस्ती स्पर्धेचे निकाल७९ किलो (दुसरी फेरी गादी गट) : सोमनाथ कोरके (नांदेड) विजयी वि. अल्ताफ शेख (औरंगाबाद), अभिषेक तुर्केवाडकर (मुंबई पश्चिम) वि. वि. वैभव तागडे (पुणे शहर), भानुदास जाधव (हिंगोली) वि. वि. मयूर बावनकर (भंडारा-अनुपस्थित), रुपेश पावसे (रायगड) वि. वि. निखील वाकोडे (अकोला), अब्दुल शोएब (अहमदनगर) वि. वि. कुंभार भांगरे (नाशिक शहर), चेतन बोडखे (बुलढाणा) वि. वि. राहुल काटकर (नागपूर), किरण जवळगे (उस्मानाबाद) वि. वि. चेतन वाणी (चंद्रपूर).

टॅग्स :Maharashtra Kesriमहाराष्ट्र केसरी