शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

दिल्लीने बिघडवले पुण्याचे गणित

By admin | Published: May 13, 2017 2:58 AM

आयपीएलच्या या सत्रात क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्यासाठी अव्वल दोन स्थानांवर राहण्याचे प्रयत्न करणाऱ्या पुणे

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 -  आयपीएलच्या या सत्रात क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्यासाठी अव्वल दोन स्थानांवर राहण्याचे प्रयत्न करणाऱ्या पुणे सुपरजायट्ंचे गणित करुण नायरने बिघडवले. नायरच्या दमदार अर्धशतकी खेळी आणि जहीरच्या दोन बळींच्याकामगिरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने पुणे सुपरजायंट्सवर ७ धावांनी विजय मिळवला.

दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र अखेरचे सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे काम दिल्लीचा संघ करत आहे. दिल्ली डेअरडेविल्सने कोटला स्टेडिअमच्या खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र संजू सॅमसन पुन्हा एकदा धावबाद झाला. गेल्या सामन्याचा हिरो श्रेयस अय्यर हा जयदेव उनाडकटचा बळी ठरला.दिल्लीचा डाव करुण नायर (६४) आणि रिषभ पंत (३६ ) यांनी सांभाळला. आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मार्लोन सॅम्युअल्स, पॅट कमिन्स, अमित मिश्रा यांच्या छोट्या पण उपयुक्त खेळीने दिल्लीने १६८ धावा केल्या.

युवा करुण नायरच्या दमदार फलंदाजीनंतर अनुभवी जहीर खानने आपला भेदक स्पेल टाकला. पहिल्याच चेंडूवर त्याने पुणे सुपरजायंट्सच्या अनुभवी अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर त्यानेच युवा आणि धोकेदायक फलंदाज राहूल त्रिपाठीला बाद करत पुण्याच्या अडचणीत आणले. पण कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि बढती मिळालेल्या अष्टपैलु मनोज तिवारी यांनी डाव सांभाळला. स्टोक्स आणि तिवारी यांच्या भागिदारीने पुण्याला बळ मिळाले. मात्र अखेरच्या काही षटकांत शमीने बेन स्टोंक्स आणि डॅनियल ख्रिस्तीयन यांना बाद करत पुण्याला बॅकफुटवर ढककले. येथेच सामना पुन्हा दिल्लीच्या बाजुने फिरला.अखेरच्या षटकांत पुण्याला विजयासाठी २५ धावांची गरज होती. मनोज तिवारी याने कमिन्सला सलग दोन षटकार मारत विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र पॅट कमिन्स पुढच्या चार चेंडूंत फक्त पाच धावा देत मनोज तिवारीला रोखले.

या सामन्यानंतर पुणे संघ तिसऱ्या स्थानावर १६ गुणांसह कायम आहे. क्वालिफायरमध्ये प्रवेश करण्याचे त्यांचे गणित आता जर तरवर अवलंबून आहे. शनिवारच्या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा पराभव केला. तर पुणे पुन्हा दुसऱ्या स्थानावर जाईल. मात्र जर कोलकाताने मुंबईला पराभूत केले. तर कोलकाता पहिल्या आणि मुंबई दुसऱ्या स्थानावर असेल. त्यातही सनरायजर्सने उद्याच्या सामन्यात गुजरात लायन्सला पराभूत केले तर सनरायजर्स गुणतक्त्यात १७ गुणांसह तिसऱ्या किंवा दुसऱ्या स्थानावर जाईल. तेव्हा पुण्याचे गणित बिघडू शकते.