शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पुणे की मुंबई?

By admin | Published: May 21, 2017 1:27 AM

तिसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-१० च्या निर्णायक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचे अवघड आव्हान राहील.

हैदराबाद : तिसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबई इंडियन्सला रविवारी आयपीएल-१० च्या निर्णायक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचे अवघड आव्हान राहील. महाराष्ट्रातील या दोन्ही संघांची झुंज अर्थात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. सामन्याच्यानिमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ वाटतात. पण प्रत्यक्षात पुण्याने यंदा मुंबईला तीनदा धूळ चारली आहे. फायनल मात्र नव्याने खेळली जाणार असल्याने सर्व पराभवांचा वचपा काढण्याची मुंबईला सुवर्णसंधी असेल. दोन वेळेचा विजेता मुंबई संघ एकूण चौथ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, अंबाती रायुडू यांना फायनल कशी जिंकायची, हे चांगले ठाऊक आहे. २०१३ आणि २०१५ च्या विजेत्या संघातही हेच खेळाडू होते. मुंबईची ताकद त्यांची राखीव फळी आहे. जोस बटलरचे स्थान लेंडल सिमन्सने घेतले. मिशेल जॉन्सनच्या जागेवर मिशेल मॅक्लेनघन आला असून त्याने १९ गडी बाद केले आहेत. नितीश राणा याने ३३३ धावा काढल्या. तो यंदाच्या स्पर्धेचा स्टार मानला जातो. जखमेतून सावरलेला रायुडू अधिक प्रभावी दिसतो. हरभजनसिंग अनुभवी असला तरी व्यवस्थापनाने कर्ण शर्मावर अधिक विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था) - स्मिथला धोनीच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. सनरायझर्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ अशा लढतीत धोनीने अनुभव पणाला लावून फलंदाजी केली. मुंबईविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये पाच षटकार खेचून सामन्याचे चित्र पालटले. पुण्याचा संघ पुढील मोसमात राहणार नसल्याने धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जच्या पिवळ्या टी शर्टमध्ये खेळताना दिसेल, अशी दाट शक्यता आहे. - पुणे संघाच्या नेतृत्वावरून उचलबांगडी झाल्याचा अपमान तो विसरला नसावा. म्हणूनच अखेरचा सामना संस्मरणीय ठरविण्याची जिद्द धोनीला लागली असावी. पुणे संघाला बेन स्टोक्सची उणीव भासणार. तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी इंग्लंड संघात परतला आहे. राहुल त्रिपाठीने ३८८ धावा ठोकल्या असून वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत कसब दाखविले आहे. - पुणे व मुंबई यांच्यात गेल्या दोन वर्षांत पाच सामने झाले आहेत. यामध्ये पुण्याने ४, तर मुंबईने एकवेळा विजय नोंदवला आहे. यातून संघ निवडणार...मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, जोस बटलर, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गोथाम, एसेला गुणरत्ने, हरभजनसिंग, मिशेल जॉन्सन, कुलवंत के, सिद्धेश लाड, मिशेल मॅक्लेनघन, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, दीपक पुनिया, नितीश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लेंडल सिमन्स, टीम साऊदी, जगदीश सुचित, सौरभ तिवारी, विनय कुमार. रायझिंग पुणे सुपरजायंट : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, अशोक डिंडा, मयंक अग्रवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बैस, रजत भाटिया, दीपक चहर, राहुल चहर, डेन क्रिस्टियन, लोकी फर्ग्युसन, जसकरण्सिंग, उस्मान ख्वाजा, सौरभ कुमार, बेन स्टोक्स, वॉशिंग्टन सुंदर, मिलिंद टंडन, मनोज तिवारी, अ‍ॅडम झम्पा, जयदेव उनाडकट, ईश्वर पांडे, राहुल त्रिपाठी, शार्दुल ठाकूर.