शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

आरसीबीच्या फलंदाजीवर पंजाब भारी

By admin | Published: May 06, 2017 1:47 AM

रॉयल चँलेजर्स बंगलुरूच्या फलंदाजाना या सत्रात नेमके काय झाले आहे हे कुणालाच कळत नाही. स्फोटक मानली जाणारे आरसीबीचे फलंदाज आता

आकाश नेवे/आॅनलाईन लोकमतरॉयल चँलेजर्स बंगलुरूच्या फलंदाजाना या सत्रात नेमके काय झाले आहे हे कुणालाच कळत नाही. स्फोटक मानली जाणारे आरसीबीचे फलंदाज आता कोण तंबूत लवकर परततो, याचीच जणू स्पर्धा लावत आहे. पंजाबकडून फक्त १३९ धावांचेलक्ष्य मिळाले असतानाही बंगलुरूचा संघ ११९ धावात सर्वबाद झाला. त्यात गेल, डिव्हिलियर्स, विराट कोहली, जाधव या चौकडीने मिळून फक्त २२ धावा केल्या. त्या गेल शुन्यावर बाद झाला. सामनावीराचा बहुमान पटकावलेल्या संदीप शर्माने या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला.त्याने तीन बळी घेतले. त्याने गेल, कोहली आणि एबीडी या तिघांना बाद केले. एकाच सामन्यात या तिन्ही फलंदाजांना या पुर्वी एकाच गोलंदाजाने बाद केले नव्हते. संदीपने या सामन्यात ही कामगिरी करून दाखवली. त्याने लागोपाठच्या प्रत्येक षटकांत एक बळी घेतला. आरसीबीची आघाडीची फळी तंबूत परत पाठवल्यावर इतर गोलंदाजांचे काम सोपे झाले. लक्ष्य छोटे असताना खेळी कशी करावी, हे आरसीबीचा सलामीवीर मनदीप सिंह याने या तिन्ही वरिष्ठ खेळाडूंना दाखवून दिले. मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. गेल बाद झाल्यावर विराटही लगेचच तंबूत परतला. दोन खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर सावधपणे संघाची धावसंख्या वाढवण्याऐवजी एबीडी फटकेबाजीच्या नादात बाद झाला. केदार जाधवनेही फटकेबाजीच्या नादात हे अक्षर पटेलकडे झेल दिला. पवन नेगी आणि सॅम्युअल बद्री या तळाच्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अष्टपैलु अक्षर पटेलने आरसीबीच्या तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ टिकू दिले नाही. पंजाबलाही फलंदाजी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र अक्षर पटेलने १७ चेंडूत ३४ धावांची दमदार खेळी केल्याने पंजाबला आरसीबीसमोर आव्हान उभे करता आले. अखेरच्या षटकांत अक्षर पटेलने शेन वॉटसनच्या षटकांत वसूल केलेल्या धावाच आरसीबीला महागात पडल्या. त्यातच पंजाबच्या अफलातून गोलंदाजीमुळे आरसीबीचा पराभव झाला. सोप्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणेही त्यांना जमले नाही. या विजयाने पंजाबच्या प्ले आॅफच्या आशांना बळ मिळाले आहे. या सामन्यातील विजयाने पंजाबने १० सामन्यात पाच विजयांसह १० गुणांची कमाई केली आहे. चौथ्या स्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या दिल्ली संघाला हा मोठा इशारा आहे. त्यासोबतच सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायजर्सला देखील आता प्ले आॅफसाठी विजय मिळवणे गरजेचे बनले आहे.