ऑनलाइन लोकमत
गोलंदाजांच्या कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणा-या टी - २० सामन्यांमध्ये फलंदाजांना रोखण्यासाठी गोलंदाजांना अथक मेहनत घ्यावी लागते. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांना पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात येते. पर्पल कॅप पटकवणा-या गोलंदाजांमध्ये चेन्नई किंग ठरली आहे. या संघाचा गोलदाजांनी दोनदा पर्पल कॅप पटकावली आहे.
आयपीएलमध्ये धावांचे डोंगर उभारले जात असताना धडाकेबाज खेळी करणा-या फलंदाजांना वेसण घालताना गोलंदाजांचा कस पणाला लागतो. आयपीएलमध्ये श्रीलंकेचा लासिथ मलिंगा हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणा-या मलिंगाने ८३ सामन्यात ११९ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर अमित मिश्राने ८६ सामन्यांमध्ये १०२ विकेट घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सोहेल तन्वीरचा क्रमांक लागतो. २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सोहेलने ४ षटकांत १४ धावा देऊन ६ विकेट घेतल्या. तर अनिक कुंबळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ३.१ षटकांत ५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या आहेत.
वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा योगदान देणा-या जेम्स फॉल्कनरने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. पियूष चावला हा आयपीएलमधील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने ९८ सामन्यात तब्बल २,५४० धावा दिल्या आहेत.
वर्ष | खेळाडू | संघ | सामने | एकूण षटकं | दिलेल्या धावा | विकेट्स | सरासरी |
२०१४ | मोहित शर्मा | चेन्नई सुपर किंग्ज | १६ | ५३.५ | ४५२ | २३ | १९.६५ |
२०१३ | ड्वॅन ब्राव्हो | चेन्नई सुपर किंग्ज | १८ | ६२.३ | ४९७ | ३२ | १५.५३ |
२०१२ | मॉर्ने मॉर्केल | दिल्ली डेअरडेव्हिल्स | १६ | ६३ | ४५३ | २५ | १८.१२ |
२०११ | लासिथ मलिंग | मुंबई इंडियन्स | १६ | ६३ | ३७५ | २८ | १३.५ |
२०१० | प्रग्यान ओझा | डेक्कन चार्जर्स | १६ | ५८.५ | ४२९ | २१ | २० |
२००९ | रुद्रप्रताप सिंह | डेक्कन चार्जर्स | १६ | ५९.४ | ४१७ | २३ | १५.५६ |
२००८ | सोहेल तन्वीर | राजस्थान रॉयल्स | ११ | ४१.१ | २६६ | २२ | १२.०९ |