नवी दिल्ली : स्टार स्ट्रायकर राणी रामपाल पुढील महिन्यात गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या १८ सदस्यीय महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवील, तर गोलरक्षक सविता उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडेल.भारतीय संघाला ४ एप्रिलपासून सुरू होणा-या या स्पर्धेत मलेशिया, वेल्स, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत अ गटात ठेवण्यात आले आहे. भारताची सलामीची लढत ५ एप्रिल रोजी वेल्स संघाविरुद्ध होईल. २७ वर्षीय सविताने संघात पुनरागमन केले आहे. तिला दक्षिण कोरिया दौ-यावर विश्रांती देण्यात आली होती. तिच्यासोबत रजनी इतिमारपूही अन्य गोलरक्षक असेल.भारतीय संघ सध्या जगात दहाव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना जागतिक क्रमवारीतील दुसºया स्थानावरील इंग्लंड, चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंड आणि पाचव्या स्थानावरील यजमान आॅस्ट्रेलियाकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)>भारतीय संघ पुढीलप्रमाणे : गोलरक्षक : सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू. बचावफळी : दीपिका, सुनीता लाकरा, दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, सुशीला चानू पुखरामबाम. मध्यफळी : मोनिका, नमिता टोप्पो, निकी प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंज. आघाडीची फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवजोत कौर, नवनीत कौर, पूनम राणी.
राणीकडे हॉकी संघाचे नेतृत्व, १८ सदस्यीय संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 3:59 AM