शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बुद्धिबळाच्या ६४ घरांत भारताचे उज्ज्वल भविष्य! अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे यांचा खास लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 13:28 IST

R Praggnanandhaa: अजरबैजान येथे घेण्यात आलेली बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा ही खळबळजनक म्हणावी लागेल. असं का, जेव्हा उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा खेळाडू गेले तेव्हा शेवटच्या ८ खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच असे दिसून आले की, त्यात आठापैकी ४ खेळाडू भारतीय होते.

 R Praggnandhaa, Future of Indian Chess! Special article by Arjuna awardee Pravin Thipse

 - प्रविण ठिपसे( अर्जुन पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर) 

अजरबैजान येथे घेण्यात आलेली बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा ही खळबळजनक म्हणावी लागेल. असं का, जेव्हा उपांत्यपूर्व फेरीत जेव्हा खेळाडू गेले तेव्हा शेवटच्या ८ खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच असे दिसून आले की, ज्यात एकही रशियन नाही, एकही चीनी खेळाडू नाही, एकही पोलंडचा, हंगेरी, जर्मनी, रोमानिया यांचा खेळाडू नाही. त्यात आठापैकी ४ खेळाडू भारतीय होते. त्यामुळे एक खळबळ उडाली, पूर्वी USSR च्या काळामध्ये अगदी यूएसएसआरचं वर्चस्व असायचं तशी परिस्थिती आज वर्ल्ड कपमध्ये उत्पन्न झाली, भारताबद्दल. यापूर्वीचा जो विश्वचषक झाला होता २०१८ मध्ये त्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीत आठपैकी ३ चीनी खेळाडू होते, काही रशियन होते. आपण बघतो की रशियन खेळाडू टॉप स्थानामध्ये असतात, परंतु यावेळी तसं चित्र दिसलं नाही. नाकामुरासारखा खेळाडू उपांत्यपूर्व फेरीच्या बाहेर होता. त्यामुळे यंदाची ही स्पर्धा खूप आव्हानात्मक म्हणावी लागेल. भारतीयांनी यंदा वर्चस्व गाजवले. ही प्रगती कशी झाली, त्याच्याविषयी आपण चर्चा करूया...

चेस ऑलिम्पियाड जी बुद्धीबळाची ऑलिम्पिक स्पर्धा आहे, जी दर दोन वर्षांनी होते. यामध्ये फार पूर्वी म्हणजे २०१४ मध्ये आपल्याला कांस्यपदक मिळालं होतं. परंतु, बरेचदा आपण चौथे व सहावे आलो होतो, तेव्हाही पदकापासून दूर राहिलोच होतो. आपल्याकडे एक निवड प्रक्रिया आहे की जी कुणावर अन्याय होऊ देत नाही. त्यामध्ये काय होतं गेल्या चार रेटिंग लिस्टमधून रेटिंग बघून त्यातील टॉप प्लेअर निवडले जातात. पण, यात काही गोष्टींचा विचार केला जात नाही. उदा... ऑलिम्पियाड ही स्वीस लीग स्पर्धा आहे आणि जे खेळाडू स्वीस लीग खेळत नाही किंवा त्यांचा या प्रकारात परफॉर्मन्स कसा होईल, याविषयी आपण विचार करत नाहीत. त्यामुळे ऑलिम्पियाडमध्ये बऱ्याचदा आपण खाली देखील आलो आहोत. ही पूर्वीची घटना आहे. पण, ४४ वी ऑलिम्पियाड जेव्हा भारतात घ्यायचं ठरलं तेव्हा अचानक भारताला  दोन संघ खेळवायची संधी मिळाली, प्रत्यक्षात ऑड नंबर आल्याने तिसरा संघ खेळवण्याची संधी मिळाली. दुसऱ्या संघाची जेव्हा घोषणा झाली, तेव्हा आपली दुसरी फळी आहे, ज्युनियर्सची त्यांची निवड झाली. म्हणजे, गुकेश, निहाल सरीन आणि प्रज्ञाननंदा, हे रेटिंगप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या पटावर होते. हा जो संघ होता तो ११ वा मानांकित होता आणि पहिला संघ होता तो दुसरा मानांकित होता. प्रत्यक्षात काय झालं तर आपल्या ब संघाला कांस्यपदक मिळालं, तर अ संघाला कुठलंच पदक मिळालं नाही. वैयक्तिक पातळीवर जर आपण पाहिलं तर गुकेशला पहिल्या बोर्डवरती सुवर्णपदक मिळालं, तर मॅग्नस कार्लसनला कांस्यपदक मिळालं. दुसऱ्या बोर्डवरती निहालला सुवर्णपदक मिळालं. तिसऱ्या पटावरती अर्जुन रियासीला रौप्यपदक, तर प्रज्ञाननंदाला कांस्यपदक मिळालं. अशी टॉपच्या बोर्डवर ४-४ पदकं जिंकणारा भारत एकमेव संघ ठरला.

जेव्हा आपला संघ लागला तेव्हा कार्लसन म्हणाला की, भारत अ संघापेक्षा हा भारत ब संघ चांगला आहे. तसंच प्रत्यक्षात झालं. त्यामुळे एक लक्षात आलं की जे खेळाडू ज्यांना कधी संधीच मिळत नव्हती, ते रेटिंगमध्ये सातवे, आठवे, दहावे येत होते. गुकेश, प्रज्ञाननंदा त्यावेळी. पण त्यांना अ संघात संधीच मिळत नव्हती आणि इतर खेळाडू जे खेळायचे ते टॉप २० किंवा २५ मध्ये आहेत, परंतु ते त्याच ठिकाणी काही वर्ष आहेत. काही जणं १० वर्ष व काही जणं १५ वर्ष आहेत, ते पुढे जात नाहीत. पण, ऑलिम्पियाडमुळे अचानक गुकेश, निहाल, प्रज्ञाननंदा यांच्या लक्षात आलं की जर आपण कार्लसनच्यापेक्षा पुढे येऊ शकतो, तर आपण आपल्या भारतातल्या नंबर १, नंबर २ सोबत कशाला तुलना करायला हवी. आपण जगातल्या नंबर १, नंबर २ खेळाडूंना हरवायचा प्रयत्न करायला हवा आणि त्यामुळे या खेळाडूंनी निर्भीड खेळ करायला सुरुवात केली. गेल्या वर्षभरात भारताच्या युवा खेळाडूंनी अर्जुन, गुकेश, प्रज्ञाननंदा यांनी जी प्रगती केली आहे, ती पाहता विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी आपल्याला विस्मयकारक वाटणार नाही. कारण, ते खूपच वरच्या दर्जाला गेला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या कँडीडेडसाठी प्रज्ञाननंदा पात्र ठरलेला आहे. १८व्या वर्षी प्रज्ञाननंदा हा कँडीडेड खेळणार आहे आणि बॉबी फिशरचा अपवाद वगळता कुठलाच खेळाडू इतक्या कमी वयात कँडीडेडसाठी पात्र ठरलेला नाही. विश्वनाथन आनंद २१व्या वर्षी या स्पर्धेसाठी क्वालिफाय होऊन टॉप ९ मध्ये आला आणि एक मॅच जिंकल्यावर तो टॉप ५ मध्ये आला. त्याने हा स्थान टिकवले अन् त्यानंतर तो पाचवेळा जगज्जेता झाला. पण आज १८ वर्षांचा प्रज्ञाननंदा त्या यादीत जाऊन बसला आहे. बॉबी फिशर याच्यानंतर तो दुसरा युवा खेळाडू आहे.

प्रज्ञाननंदा २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकला, तर तो वर्ल्ड चॅम्पियन्सचा चॅलेंजर ठरू शकतो. अशा प्रकारची अनपेक्षित प्रगती आहे, त्याची पायाभरणी ही ऑलिम्पियाड स्पर्धेतील निकालामुळे झाली. ४४वी ऑलिम्पियाड स्पर्धा भारतात झाली आणि दुसऱ्या संघाला त्यात खेळायची संधी मिळाली. तो संघ पहिल्या संघापेक्षा वरचढ ठरला. तेव्हा कळलं या खेळाडूंना एक्सपोझर मिळालेलं नाहीए आणि हेच खरे आता उद्याचे चॅम्पियन आहेत. ही एक जाणीव झाली आणि या खेळाडूंनी देखील बाहेर जाऊन जास्त स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. त्याची परिणीती याच्यामध्ये झालीय की आज आपल्याला एक सूर गवसला आहे, वरचा टप्पा गाठलेला आहे. पूर्वी कसं होतं विश्वनाथन आनंद सोडला, तर बाकीचे आपले टॉपचे खेळाडू होते ते जगात वीसावे-पंचवीसावे असेच होते. म्हणजे जगात चारात-पाचात नव्हता. आता तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुकेश ८व्या स्थानावर आहे. प्रज्ञाननंदा व गुकेश हे टॉप ४-५ मध्ये शिरू शकतात. वर्ल्ड चॅम्पियन्सशीप कँडीडेड भारत पात्र ठरलेला आहे आणि अचानक स्तर बदललेला आहे. भारत यूएसएसआरसारखा सूप्रिम पॉवर आता ठरलेला आहे. त्याचं प्रदर्शन आपल्याला ग्लोबल चेस लीग आणि वर्ल्ड कपमध्ये दिसून आलं. आपण जुलै २०२२ आणि ऑगस्ट २०२३ मधील १३ महिन्यात भारत चांगला बुद्धीबळ खेळणारा देश पासून ते सर्वोकृष्ट बुद्धीबळ खेळणारा देश बनला आहे. त्यासाठी चार युवा खेळाडू, गुकेश, प्रज्ञाननंदा, अर्जुन व निहाल यांच्या हातात भारताच्या बुद्धीबळाचं भविष्य हातात असेल, असं सध्या वाटतंय. पण, त्याचवेळी आपल्याकडे अजूनही युवा खेळाडू तयार आहेत. या युवा खेळाडूंनी यशाची पट्टी क्रॉस केली आहे, जे आधी विश्वनाथन वगळता इतरांना जमलं नव्हतं. या युवा खेळाडूंमध्ये जगज्जेता होण्याची संधी आहे. २०२६ किंवा २०२८ च्या स्पर्धेमध्ये भारतीय वर्ल्ड चॅम्पियन बघायला मिळेल, असे मला वाटतं.

एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला नमुद करावी वाटते... विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत आठपैकी ४ खेळाडू भारतीय होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे प्रज्ञाननंदाचा परफॉर्मन्स इतरांपेक्षा वरचढ का आहे? कारण आपले बरेचसे खेळाडू, विशेषतः अर्जुन आणि विदीत यांची रेटिंग खूप चांगली आहे आणि ते नेहमी टॉप हाफमध्ये असायचे. त्यामुळे त्यांना त्यांच्या रेटिंगपेक्षा कमी असलेल्या खेळाडूंसोबत खेळायला मिळायचं. पण, प्रज्ञाननंदाचं रेटिंग कमी असल्यामुळे त्याला त्याच्यापेक्षा बलाढ्य खेळाडूंसोबत खेळावं लागलं. लॅग्रेव्ह, नवारा, नाकमुरा, करुआना या टॉप खेळाडूंविरुद्ध तो खेळला. आपल्यापेक्षा चांगल्या अशा चार खेळाडूंना प्रज्ञाननंदाने हरवले. त्यामुळे इतरांचा परफॉर्मन्स जरी चांगला होता, तरी प्रज्ञाननंदाच्या कामगिरीची तुलना त्याच्याशी करता येत नाही. जेव्हा त्याने नाकामुराला हरवलं तेव्हा आपला डाव सुरू असूनही मॅग्नस कार्लसन पटावरून उठला अन् त्याने येऊन प्रज्ञाननंदाचे अभिनंदन केलं. तेव्हा कार्लसनलाही मनापासून वाटलं की बहोद दिनो के बाद कोई एैसा मिला है, जो इतनी बात कर सके...

कार्लसनने जेव्हा पत्रकार परिषद बघितली तेव्हा त्याने भारताच्या युवा खेळाडूंचे कौतुक केले. त्यांच्यात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं मटेरियल आहे आणि यांच्यापैकी एक वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकतो, असे त्याने मत मांडलं. काही वर्षांपूर्वी इराणचा अलिरेझा फिरोजा हा वर्ल्ड चॅम्पियन होईल, असे त्याचे मत होते. पण, फिरोजाने बुद्धीबळपेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिले आणि त्यामुळे तो आता बाहेर गेला. खेळात इनकन्सिस्टन्सी एलिमेंट जास्त असतं. अनसर्टनटी एलिमेंट खूप असतात.. आज हा खेळाडू चॅम्पियन झाला, तर उद्या दुसरा खेळाडू चॅम्पियन होऊ शकतो. दुसरा कोणी आपली जागा घ्यायला तयारच असतो, जरा आपली चूक झाली तर आपले स्थान जाऊ शकते. या अनिश्चितीतेवर मात करता आली पाहिजे. आज भविष्यातील वर्ल्ड चॅम्पियन कोण बनू शकतो, तर प्रज्ञाननंदा, गुकेश यांचे नाव घेतले जाते. सगळे देशांचे हेच मत आहे. अशा प्रकारचा सन्मान भारताला गेल्या १३ महिन्यांच्या यशामुळे मिळाली आहे. या युवा खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी केली आहे आणि पुढे या खेळाडूंची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहे.

शब्दांकन - स्वदेश घाणेकर

टॅग्स :R Praggnanandhaaआर प्रज्ञाननंदाChessबुद्धीबळ