काही दिवसांपूर्वी मॅग्नस कार्लसन याच्याकडून जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर लगेचच आर प्रज्ञाननंदा FIDE World Rapid Team Championship स्पर्धेत सहभागी झाला अन् त्याने त्यात गोल्ड मेडल जिंकले. WR Chess संघात प्रज्ञाननंदासह सो वेस्ली, अब्दुसातोरोव्ह नोडीर्बेक, नेपोमनिआचची इयान, डुडा जान-क्रझीतोफ, केयमेर व्हिन्सेंट, हो यिफान, कोस्तेनिक अलेक्झांड्रा या ग्रँडमास्टर्ससह रोसेन्स्टेन वादीम यांचा समावेश होता. या संघाने १२ पैकी १० सामने जिंकले अन् दोनमध्ये ड्रॉवर त्यांना समाधान मानावे लागले. या संघाने सर्वाधिक २२ गुणांची कमाई केली. टीम फ्रिडमला दुसऱ्या, तर भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम MGD1 ला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यांनी अनुक्रमे २० व १८ गुणांची कमाई केली.
बुद्धिबळाच्या ६४ घरांत भारताचे उज्ज्वल भविष्य! अर्जुन पुरस्कार विजेते प्रविण ठिपसे यांचा खास लेख
WR Chess संघाने ११व्या फेरीत विजय मिळवून जेतेपद पक्के केले, त्याच फेरीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फ्रिडमला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक, पदक आणि १ लाख युरो ( जवळपास ९० लाख रुपये) असे पारितोषिक देण्यात आले. टीम फ्रिडमला ५४ लाख, तर MGD1 ला ३६ लाख बक्षीस रक्कम मिळाली. MGD1संघात भारताच्या हरिकृष्णा, निहाल, एरिगैसी, साधवानी, आदित्य, श्रीनाथ, हरिका या खेळाडूंचा समावेश होता.