शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

राफाची अंतिम फेरीत धडक..

By admin | Published: January 27, 2017 8:06 PM

स्पेनचा १४ ग्रँडस्लॅम विजेता बलाढ्य राफेल नदाल याने तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

ऑनलाइन लोकमतमेलबर्न, दि. 27 : स्पेनचा १४ ग्रँडस्लॅम विजेता बलाढ्य राफेल नदाल याने तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत बल्गेरीयाच्या ग्रिगोर दिमित्रोवचे कडवे आव्हान ६-३, ५-७, ७-६(५), ६-७(४), ६-४ असे परतावले. विशेष यासह टेनिसप्रेमींना पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमची रॉजर फेडरर वि. राफेल नदाल अशी ड्रीम फायनल अनुभवण्याची संधी मिळाली आहे.

अत्यंत थरारक झालेल्या या अंतिम सामन्यात नदालने पहिला सेट जिंकून आश्वासक सुरुवात केली. परंतु, झुंजार दिमित्रोवने सहजासहजी हार न पत्करताना नदालला चांगलेच दमवले. पाच सेटपर्यंत गेलेल्या या रोमांचक सामन्यात नदालने अंतिम सेटमध्ये मोक्याच्यावेळी दिमित्रोवची सर्विस ब्रेककरुन निर्णायक आघाडी घेतली. यानंतर दबावाखाली आलेल्या दिमित्रोवच्या माफक चुकांचा फायदा घेत त्याने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

आता, टेनिसप्रेमींची प्रतीक्षा लागली आहे ती रविवारी होणाऱ्या हायव्होल्टेज अंतिम सामन्याची. २०१४-२०१५ नंतर पहिल्यांदाच फेडरर - नदाल आमनेसामने येतील. त्यावेळी फेडररने स्विस ओपनच्या अंतिम सामन्यात नदालला नमवून जेतेपद पटकावले होते. याआधी २०१४ साली आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात फेडरर - नदालची लढत झाली होती. त्यात नदालने सरल तीन सेटमध्ये बाजी मारुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

लक्षवेधी :- २०११ च्या फ्रेंच ओपन फायनलनंतर पहिल्यांदाच फेडरर वि. नदाल अशी ग्रँडस्लॅम फायनल होईल.- २००९ साली आॅस्टे्रलियन ओपनमध्ये फेडररला नमवून नदालने जेतेपद पटकावले होते.- आतापर्यंत ३ वेळा या स्पर्धेत फेडडर - नदाल आमनेसामने आले असून तिन्ही वेळा नदालने बाजी मारली आहे.- २०१२ व २०१४ साली उपांत्य सामन्यात नदालने उपांत्य सामन्यात फेडररला पराभूत केले.- नदाल व फेडरर यांच्यातील एकूण सामन्यांचा रेकॉर्ड २३-११ असा आहे. - ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यातही याआधी नदालने फेडररविरुध्द ६-२ असे ववर्चस्व राखले आहे. - नजीकच्या काळात नोव्हेंबर २०१५ मध्ये फेडररने स्विस ओपन अंतिम सामन्यात नदालला पराभूत केले.- नदालने २०१४ साली फ्रेंच ओपनच्या रुपाने आपले अखेरचे ग्रँडस्लॅम जिंकले होते.- ह्यओपन युगह्णमध्ये चारही ग्रँडस्लॅम किमान दोन वेळा जिंकण्यारा पहिला खेळाडू बनण्याची नदालला संधी.- पुरुष व महिला गटाची अंतिम फेरी गाठणारे सर्व खेळाडू ३० किंवा त्याहून अधिक वयाचे. ........................................रॉजर फेडररसह पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी खेळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच, ग्रँडस्लॅमची अंंतिम फेरी गाठणे आम्हा दोघांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. गतवर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले. पुन्हा एकदा उच्च स्तरावर येण्यासाठी खूप मेहनत घेतली. रॉलँड गॅरोस (फ्रेंच ओपन) माझ्यासाठी खूप कठीण ठरले. आॅस्टे्रलियन ओपनची अंतिम फेरी गाठण्याचे मी स्वप्न पाहिले नव्हते... पण मी आता अंतिम फेरीत आहे. मी स्वत:ला खूप नशिबवान समजत असून सध्या मी खूप खूश आहे. - राफेल नदाल