शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

विंडिज दौऱ्यात रहाणे उपकर्णधार : कसोटी संघात मुंबईकर शार्दुल ठाकूरचा समावेश

By admin | Published: May 23, 2016 8:38 PM

युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपविण्यात आली आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

एमएस धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व मुंबई : आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपविण्यात आली आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी भारताच्या कसोटी संघात मुंबई रणजी संघाचा प्रमुखे वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा एकमेव नवा चेहरा असेल. सोमवारी मुंबईत दोन्ही दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विदर्भचा युवा फलंदाज फैझ फझलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे. तर मुंबईकर शार्दुलला विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. जून महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर जुलै - आॅगस्ट महिन्यात टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास जाईल.राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव अजय शिर्के यांनी निवड समितीच्या बैठकीनंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा केली. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला असून एकदिवसीय व टी२० मालिकेसाठी एकच संघ ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे विंडिज दौऱ्यासाठी १७ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला आहे. विशेष म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या प्रमुख फलंदाजांना झिम्बाब्वे दौऱ्याकरीता विश्रांती देण्यात आली आहे.फैझ फझल, युजवेंद्र चहल आणि जयंत यादव हे मर्यादित षटकांच्या संघात नवीन चेहरे असून टी२० विश्वचषक संघातील खेळाडू आणि यंदाच्या आयपीएलमध्ये साडेआठ करोडची मोठी किंमत मिळवणाऱ्या पवन नेगीला मात्र टी२० संघातून बाहेर करण्यात आले आहे. ......................................यंदाच्या मोसमात भारतीय संघाला एकूण १७ कसोटी सामने खेळायचे असून निवडकर्त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांना झिम्बाब्वे दौऱ्याकरीता विश्रांती दिली आहे. मागील दोन झिम्बावे दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र यावेळी त्याच्याकडे कर्णधारपद असून या दौऱ्यानंतर टीम इंडिया कसोटी सामन्यांत व्यस्त होणार असल्याने धोनीला यादरम्यान मोठी विश्रांती मिळणार आहे. ..............................................मर्यादित षटकांच्या संघात लेग स्पिनर युजवेंद्र चहल, आॅफ स्पिनर जयंत यादव, फैज फझल, मनदीप सिंग आणि करुण नायर यांचा समावेश आहे. तसेच पवन नेगी, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना टी२० संघातून तर गुरकीरत सिंगला मागील एकदिवसीय संघातून वगळण्यात आले........................................यंदाच्या आयपीएलमध्ये छाप पाडलेला युझवेंद्र १९ बळींसह अग्रस्थानी आहे. त्याने रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडून यंदा ११ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ७७ टी२० सामन्यांत ८० बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे सध्या आयपीएलशी निगडीत नसलेला फैझ एकमात्र खेळाडू संघात आहे. फैझने २०११ पर्यंत राजस्था रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. सध्या तो इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत आहे. ........................................जुलै - आॅगस्ट महिन्यात विंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात मुंबईकर शार्दुल एकमेव नवा चेहरा आहे. या दौऱ्याकरीता रहाणेला उपकर्णधारपदी निवडण्यात आले असून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे मार्च २०१५ पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता........................................शार्दुलने सलग दोन रणजी मोसमात चमकदार कामगिरीसह सर्वांचे लक्ष वेधले. २०१४-१५ साली त्याने ४८ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते. तर यानंतर २०१५-१६ मोसमात शादुलने ४१ बळी घेत मुंबईला ४१व्यांदा रणजी चॅम्पियन बनविण्यात मोलाचे योगदान दिले. शार्दुलने ३७ प्रथम श्रेणी सामन्यांत १३३ बळी मिळवले आहेत. ..........................................निवडण्यात आलेले भारतीय संघ :झिम्बाब्वे दौरा (एमदिवसीय व टी२०) : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), लोकेश राहूल, फैझ फझल, मनीष पांड्ये, करुण नायर, अंबाती रायडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि युजवेंद्र चहल.वेस्ट इंडिज दौरा (कसोटी) : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहूल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, अमित मिश्रा आणि स्टुअर्ट बिन्नी......................................संघ निवडताना निवड समितीने निष्पक्षपातीपणे आपला निर्णय दिला. कोणीही समितीला खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत सूचविले नव्हते. त्याचबरोबर कोणत्याही खेळाडूने बोर्डाला आपल्या उपलब्धतेविषयी कोणत्याही प्रकारे कळवले नव्हते. झिम्बाब्वे आणि विंडिज दौऱ्यासाठी युवा संघ निवडण्यामागे निवड समितीचा स्वत:चा निर्णय होता. धोनी स्वत: युवा खेळाडूंसह झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यास इच्छुक होता. अशावेळी धोनीच्या उपस्थितीमध्ये युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. त्यांना धोनीच्या नेतृत्त्वाचा आणि अनुभवाचा मोठा फायदा होईल.- संदीप पाटील, राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष....................................काही वर्षांपुर्वी मी रणजी मोसमात ७०० हून अधिक धावा काढल्या होत्या. त्यावेळी मला काही खूशखबरींची अपेक्षा होती. मात्र असे काहीही झाले नाही आणि मी निराश झालो. मागील काही वर्षांपासून मी अपेक्षा सोडली होती. आज जेव्हा मला वडिलांनी फोन करुन ही आनंदाची बातमी कळवली तेव्हापासून आजूबाजूचे जग खूप सुंदर दिसत आहे. प्रत्येकजण भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहतो, पण प्रत्येकालाच ही संधी मिळत नाही. ही संधी मला मिळाल्याचा आनंद आहे. उशीरा का होईना, पण संधी तर मिळाली. अंतिम एकादशमध्ये खेळण्यास मिळाले तर या संधीचे सोने करेल.- फैझ फझल.........................................