लंडन : नॉटिंगहॅम कसोटीतील वादाचे सावट लॉडर््स कसोटीवरही पाहायला मिळाले. लॉडर््सचे मैदान सर्वोत्कृष्ट कोण आहे हे ठरवण्यासाठीच्या लढाईचे ठिकाण बनले आहे. लॉर्ड््सच्या हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याने नाणेफेक जिंंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नॉटिंगहॅम हे गोलंदाजांचे कर्दनकाळ होते तर लॉर्ड्स फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरण्याची शक्यता आहे. इंग्लडच्या मदतीला सूर्यही धावून आला. पहिल्या सत्रात सूर्याने क्वचितच दर्शन दिल्यामुळे याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांनी उठवला. इंग्लंडचे गोलंदाज हातात रिमोट कंट्रोल असल्यासारखे चेंडू हवा तसा स्विंग करत होते. सामन्यातील पहिल्या चेंडूपासूनच खेळपट्टीने आपले रंग दाखवायला सुरु केले. वेस्ट इंडिजचे महान खेळाडूू मायकल होल्डिंग्ज म्हणाले,‘ या खेळपटट्ीवर जर तुम्हाला लवकर बळी मिळत नसतील तर तुम्ही योग्य गोलंदाजी करत नाही आहात.’भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी भारताची ६ बाद १४० अशी निशाजनक स्थिती होती. मात्र अजिंक्य रहाणे याने तळाच्या फलंदांजांना बरोबर घेत डावाला आकार दिला व भारताला ९ बाद २९० अशी आव्हानात्मक धावसंख्या करता आली. अजिंंक्य रहाणे याने १०३ धावा केल्या. भुवनेश्वर बाद झाल्यानंतर रहाणेने मोहम्मद शमीच्या साथीने शतक पूर्ण केले. रहाणेची शतकी खेळी अॅन्डरसनने संपुष्टात आणली. त्यानंतर मोहम्मद शमी (नाबाद १४) व ईशांत शर्मा (नाबाद १२) यांनी दिवसअखेर नाबाद राहत भारताला ९ बाद २९० धावांची मजल मारुन दिली. तत्पुर्वी सलामीविर शिखर धवन (७) याला जेम्स अॅन्डरसनने झटपट माघारी परतवत यजमान संघाला पहिले यश मिळवून दिले. धवन तिसऱ्या स्लिपमध्ये तैनात गॅरी बॅलेन्सकडे झेल देत माघारी परतला. सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सुदैवी ठरलेल्या मुरली विजयला (२४) त्याचा लाभ घेता आला नाही. लियम प्लंकेटने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर आलेलल्या चेतेश्वर पुजारा (२८) व विराट कोहली (२५) यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीही (०१) लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या सत्रात सूर्य ढगाआडून बाहेर आला मात्र तरीही खेळपटटीने आपले रंग बदलले नाही. या सर्व परिस्थितीत अजिंक्य रहाणे एखाद्या सम्राटाप्रमाणे खेळला. आपल्या तंत्रशुद्ध खेळीने त्याने इंग्लडच्या गोलंदाजांची परीक्षा पाहिली. त्याने काही अत्यंत सुंदर फटके मारले. त्याने शतक झळकावल्यानंतर लॉर्डच्या गॅलरीत उभे राहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले.इंग्लंडतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज अॅन्डरसनने ५५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. ब्रॉडने २ तर प्लंकेट, स्टॉक्स व मोईन अली यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
रहाणेच्या शतकाने डाव सावरला
By admin | Published: July 18, 2014 2:09 AM