शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राहीने सुवर्ण पदकासह मिळवला ऑलिम्पिक कोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:06 AM

मराठमोळ्या राही सरनोबतने म्यूनिच येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले.

नवी दिल्ली : मराठमोळ्या राही सरनोबतने म्यूनिच येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले. यासह राहीने ऑलिम्पिक कोटाही मिळवला. त्याचवेळी, भारताचा युवा नेमबाज सौरभ तिवारी याने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पटकावले. विशेष म्हणजे सौरभने नवीन विश्वविक्रम नोंदवण्याचा पराक्रम केल्याने त्याच्या सुवर्ण पदकाला आणखी झळाळी आली.आशियाई क्रीडा स्पर्धेची विजेती राहीने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा विश्वचषक सुवर्ण पदक पटकावले. तिच्या जोरावर भारताने टोकियो आॅलिम्पिकसाठी सहावे तिकिट पक्के केले. राहीसह युवा नेमबाज मनू भाकरचाही समावेश होता. अंतिम फेरीत मनूने राहीच्या तुलनेत चांगली सुरुवात करत अपेक्षाही उंचावल्या. सहाव्या फेरीपर्यंत मनू, राही आणि युक्रेनची ओलेना कोस्टिविच प्रत्येकी २१ गुणांसह आघाडीवर होत्या. मात्र सातव्या फेरीत बंदुकीमध्ये बिघाड झाल्याने मनू पाचव्या स्थानी घसरली आणि स्पर्धेबाहेर पडली. मात्र, राहीने कामगिरीत सातत्य राखताना आठव्या व नवव्या फेरीत परफेक्ट पाच वेध घेतले. तिने ३७ गुणांसह सुवर्ण जिंकले, तर ओलेनाला ३६ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बल्गेरियाच्या एंटोनेटा बोनेवाने २६ गुणांसह कांस्य जिंकले.तत्पूर्वी, मेरठच्या १७ वर्षीय चौधरीने अंतिम फेरीमध्ये २४६.३ गुण नोंदवले. अशा प्रकारे त्याने फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे विश्वचषकातील स्वत: केलेला २४५ गुणांचा विक्रम मोडीत काढला. चौधरीने याआधीच टोकियो आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केलेला आहे. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये रशियाच्या आर्तम चेरसुनोवने रौप्य आणि चीनच्या वेई पेंगने कांस्यपदक जिंकले.चौधरीने अंतिम फेरीत पहिल्या शॉटमध्ये ९.३ गुण मिळवले; परंतु त्यानंतर सलग पाच शॉटमध्ये त्याने १०.१ गुणांची नोंद केली. पहिल्या फेरीनंतर तो चेरसुनोव्हाच्या तुलनेत ०.६ गुणांनी पिछाडीवर होता. दुसºया फेरीत मात्र त्याने आघाडी मिळवली. त्यात त्याने तीन शॉटमध्ये १० पेक्षा कमी गुण मिळवले; परंतु दोन शॉटमध्ये सलग १०.७ गुणांची कमाई केली. भारतीय नेमबाजाने त्यानंतर प्रत्येक एलिमिनेशनमध्ये आघाडी कायम ठेवली. त्याने अखेरीस १०.३ चे दोन शॉट, तर एक शॉट १०.७ चा लगावला. चौधरीचा अखेरचा शॉट १०.६ चा होता. त्यात तो स्वत:चा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.भारतीय संघ ३ सुवर्ण पदकांसह या स्पर्धेत आघाडीवर असून चीन एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांसह दुसºया स्थानी आहे. (वृत्तसंस्था)>शहजार रिझवी पाचव्या स्थानीभारताचा शहजार रिझवीदेखील या स्पर्धेत सहभागी होता. त्याने अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले खरे; परंतु अखेरीस १७७.६ गुणांसह तो पाचव्या स्थानावर राहिला. भारताचे म्युनिच विश्वचषकातील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी रविवारी अपूर्वी चंदेला हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबत