भारताची नेमबाज राही सरनोबत हिनं प्रेसिडेंट कप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक जिंकले. पिस्तुलात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राहीचे काही नेम चूकले, परंतु तरीही तिनं अखेरपर्यंत संघर्ष करताना रौप्यपदकावर नाव कोरलं. राहीने 31 गुणांची कमाई केली. ISSF प्रेसिडेंट कपमध्ये शूटिंग प्रकारातील फक्त वर्ल्ड टॉप 10 स्पर्धकांचा सहभाग होता आणि अंतिम फेरीतील आठ स्पर्धकांमध्ये राहीसोबत भारताची मनु भाकेर ही होती. मनू भाकेरला 17 गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
Rahi Sarnobat : पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतनं भारताला जिंकून दिलं पदक, President’s Cup मध्ये रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:43 IST