मुंबई : धावपटू राहुल कुमार पाल आणि ज्योती चौहान यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावत मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये छाप पाडली. १५ हजारांहून अधिक धावपटूंमधून १: ०४: २८ सेकंदात २१ किमीचे अंतर पूर्ण करत राहूलने अजिंक्यपदावर नाव कोरले. तर कालिदास हिरवेला १:०४.३१ सेकंदासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दामोर मोहनभाईने १: ०५: ०१ सेंकद ही वेळ नोंदवून तिसऱ्या स्थानी झेप घेतली.महिला गटातील अर्धमॅरेथॉनमध्ये ज्योती चौहानने ०१:२८.२५ सेकंद या वेळेसह विजेतेपद मिळवले. तर सीमाने ०१:२९.३२ सेकंद वेळेसह दुसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या १० किमी स्पर्धेत परशुराम भोयने पहिले स्थान मिळवले. दिनेश गुरुनाथला दुसरे आणि अमित भगवान मालीला तिसरे स्थान मिळाले. महिलांमध्ये आरती सुरवसेने अव्वल क्रमांक मिळवला. तर दुसरे आणि तिसरे स्थान अनुक्रमे प्रियंका नवकूदकर, अर्पिता नागराज यांनी मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)>प्रत्येक धावपटू हाहिरोच आहे - सचिनभारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अर्ध मॅरेथॉनचे फ्लॅगआॅफ केले. यावेळी सचिन म्हणाला की, निरोगी आयुष्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अनुभवणे गरजेचे आहे. धावपळीच्या आयुष्यात नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी देश घडवण्यासाठी निरोगी नागरिक असणे आवश्यक असून, अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक धावपटू हा हिरोच आहे. २१ किमी हे अंतर पार करणे सोपे नाही. ते पार करण्यासाठी नियोजन, शिस्त आणि अंतर पूर्ण करण्याची जिद्द आवश्यक आहे. या सगळ््या गोष्टीं मॅरेथॉनमधील धावपटूंमध्ये आहे.
मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये राहुल, ज्योतीची छाप
By admin | Published: August 22, 2016 4:32 AM