शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

सिंधूवर अभिनंदनाचा वर्षाव !

By admin | Published: August 20, 2016 5:38 AM

काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथसिंग, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी

नवी दिल्ली : काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथसिंग, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सिंधूचे अभिनंदन केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,आॅलिम्पिक पदक विजेते केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, सोनिया गांधींनी सिंधूचे पदक हे भारतमातेच्या मुकुटातील अमूल्य ‘हिरा’ असल्याचे सांगून भावी पिढीसाठी सिंधूची कामगिरी प्रेरणादायी असेल, असे संदेशात म्हटले आहे.माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, टेनिसपटू लियांडर पेस, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद, बिलियार्डस् चॅम्पियन पंकज अडवाणी, व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग, ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन महेश भूपती, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश, आॅलिम्पिक बॉक्सर शिवा थापा आदींनी सिंधूची पाठ थोपटली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिनंदन!राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य विजेत्या सिंधूचे अभिनंदन करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘देशासाठी गौरवपूर्ण क्षण. तू शानदार खेळ केलास! रौप्य जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन!’, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरवर लिहिले,‘ तुझी झुंजारवृत्ती दीर्घकाळ स्मरणात राहील. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!’ भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच अ.भा. क्रीडा परिषदेचे प्रमुख विजय कुमार मल्होत्रा यांनीदेखील सिंधूचे अभिनंदन केले.खेळ भावनेची झलकमारिनने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि कोर्टवर चक्क ठाण मांडले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्याचवेळी सिंधूने तिच्याकडे धाव घेतली. मारिनला आलिंगन देत सिंधूने खेळभावनेचा परिचय दिला.मुलीचे यश अप्रतिम : रमण्णाबॅडमिंटनमध्ये आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूवर वडील पी. व्ही. रमण्णा व आई विजया यांना गर्व वाटतो. माझ्या मुलीची कामगिरी अप्रतिम असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन पुरस्काराचे मानकरी असलेले माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू रमण्णा पुढे म्हणाले,‘ सिंधू आणि कोच पुलेला गोपीचंद यांनी केलेल्या कठोर तपश्चर्येचा हा सुखद परिणाम आहे. लक्षवेधी...२१ वर्षांची सिंधू आॅलिम्पिक वैयक्तिक रौप्य जिंकणारी चौथी भारतीय खेळाडू ठरली. नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड(२००४ अथेन्स), नेमबाज विजय कुमार (२०१२ लंडन) आणि मल्ल सुशील कुमार(२०१२ लंडन)यांनी यापूर्वी रौप्यपदक जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपची दोन वेळा कांस्य विजेती असलेली सिंधू भारतासाठी आॅलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी महिला आणि रौप्य पदक जिंकणारी पहिलीच महिला खेळाडू ठरली. बक्षीसांचाही वर्षाव!‘बाई’कडून सिंधूला ५०, गोपीचंद यांना १० लाखभारतीय बॅडमिंटन संघटनेने (बाई) पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकाबद्दल ५० लाखाचा रोख पुरस्कार आणि प्रशिक्षक गोपीचंद यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. मध्य प्रदेशकडून सिंधूला ५० लाखमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सिंधूचे अभिनंदन करीत ५० लाखाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली. फुटबॉल महासंघ : सिंधू-साक्षीला प्रत्येकी ५ लाखअखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सिंधू व साक्षी मलिक यांना प्रत्येकी ५ लाख देण्याची घोषणा केली आहे.