सिडनी : वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा चौथा दिवसदेखील पावसामुळे होऊ शकला नाही. बुधवारी एकही चेंडू न टाकला गेल्यामुळे हा सामना अनिर्णीत ठरण्याची शक्यता आहे.कसोटीच्या पहिल्या दिवशीच पावसाने अडथळा आणला होता आणि ७५ षटकांचाच खेळ शक्य झाला. दुसऱ्या दिवशी तर ११.२ षटकांचाच खेळ झाला आणि तिसऱ्या व चौथ्या दिवशी सातत्याने पाऊस झाल्याने खेळाडू मैदानावर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ही लढत अनिर्णीत ठरण्याचीच शक्यता आहे.वेस्ट इंडीजने त्यांच्या पहिल्या डावात ७ बाद २४८ धावा केल्या आहेत. संघाकडून सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक ८५ धावा केल्या, तर कार्लोस ब्रेथवेटने ६९ व डॅरेन ब्राव्होने ३३ धावांची खेळी केली. दिनेश रामदिन (३०) व केमार रोच (०) हे नाबाद आहेत.(वृत्तसंस्था)
सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीही पाऊस
By admin | Published: January 07, 2016 12:11 AM