बर्मिंगहॅम : पावसाने दमदार खेळी खेळल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी ‘अ’ गटातील आॅस्टे्रलिया विरुध्द न्यूझीलंड सामना अखेर रद्द करण्यात आला. पावसाच्या व्यत्ययानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून देण्यात आला. पावसामुळे ही लढत ४६ षटकांची खेळविण्यात आली. न्यूझीलंडची फलंदाजी झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने आॅस्टे्रलियाला ३५ षटकात २३५ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या आॅस्टे्रलियाचे ३ फलंदाज झटपट बाद करुन किवींनी मजबूत पकड मिळवली. यावेळी आलेला पाऊस कायम राहिल्याने पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, न्यूझीलंडने ४५ षटकात सर्वबाद २९१ अशी आव्हानात्मक मजल मारली. कर्णधार केन विलियम्सनचे आक्रमक शतक आणि ल्यूक राँचीची चौफेर फटकेबाजी या जोरावर किवींनी कांगारुंविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. आॅस्टे्रलियाच्या जोश हेजलवूडने ५२ धावांत ६ बळी घेत न्यूझीलडच्या धावसंख्येला काहीप्रमाणात वेसण घालण्याचे काम केले. (वृत्तसंस्था)ल्यूक राँचीने कर्णधार विलियम्सनचा प्रथम फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवताना हल्ला चढवला. त्याने ४३ चेंडूत ९ चौकार व ३ षटकात ठोकत ६५ धावा चोपल्या. सलामीवीर मार्टिन गुप्टील (२६) बाद झाल्यानंतर राँची - विलियम्सन यांनी ७७ धावांची वेगवान भागीदारी करुन न्यूझीलंडला सावरले. विलियम्सनने ९७ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकारांसह १०० धावांची खेळी केली. त्याने राँची बाद झाल्यानंतर रॉस टेलरसह (४६) तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. मात्र, हेजलवूडने मोक्याच्यावेळी धक्के दिल्याने न्यूझीलंडचा डाव ४५ षटकात २९१ धावांमध्ये गुंडाळला. हेजलवूडने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना न्यूझीलंडना तिनशेचा पल्ला पार करु दिला नाही. त्याचवेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हेजलवूडने दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी केली. श्रीलंकेच्या महारुफने २००६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध १४ धावांत ६ बळी घेतले होते. न्यूझीलंडने अखेरचे ७ फलंदाज अवघ्या ३७ धावांत गामवल्याने त्यांना तिनशेचा पल्ला गाठण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)धावफलकन्यूझीलंड : मार्टिन गुप्टील झे. मॅक्सवेल गो. हेजलवूड २६, ल्यूक राँची झे. मॅक्सवेल गो. हॅस्टिंग्स ६५, केन विलियम्सन धावबाद (हेन्रीक्स-कमिन्स) १००, रॉस टेलर झे. हेन्रीक्स गो. हॅस्टिंग्स ४६, नील ब्रूम झे. मॅक्सवेल गो. हेजलवूड १४, जेम्स नीशाम झे. वॉर्नर गो. हेजलवूड ६, कोरी अँडरसन झे. हेन्रीक्स गो. कमिन्स ८, मिशेल सँटनर झे. स्मिथ गो. हेजलवूड ८, अॅडम मिल्ने झे. मॅक्सवेल गो. हेजलवूड ११, टिम साऊदी नाबाद ०, टे्रंट बोल्ट झे. वेड गो. हेजलवूड ०. अवांतर - ७. एकूण : ४५ षटकांत सर्वबाद २९१ धावा.गोलंदाजी : मिशेल स्टार्क ९-०-५२-०; जोश हेजलवूड ९-०-५२-६; पॅट कमिन्स ९-०-६७-१; जॉन हॅस्टिंग्स ९-०-६९-२; ट्राविस हेड ४-०-२२-०; मोइसेस हेन्रीक्स ५-०-२५-०.आॅस्टे्रलिया : डेव्हिड वॉर्नर झे. राँची गो. बोल्ट १८, अॅरोन फिंच झे. टेलर गो. मिल्ने ८, स्टिव्ह स्मिथ नाबाद ८, मोइसेस हेन्रीक्स झे. व गो. मिल्ने १८. अवांतर - १. एकूण : ९ षटकात ३ बाद ५३ धावा. गोलंदाजी : टिम साऊदी ३-०-१५-०; टे्रंट बोल्ट ४-०-२८-१; अॅडम मिल्ने २-०-९-२.
पावसाने मारली बाजी
By admin | Published: June 03, 2017 1:03 AM