ऑनलाइन लोकमतपोर्ट ऑफ स्पेन, दि. 25 - पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (रविवारी) विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीतही सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावत धुवांधार बॅटिंग केली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले आहे. पावसामुळे खेळ दोन तास उशिरा सुरु झाला. त्यामुळे पंचांनी सामना प्रत्येकी 43 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पहिल्या लढतीत भारताने चांगली फलंदाजी केली होती. भारताने ३९.२ षटकांत ३ बाद १९९ धावांची मजल मारल्यानंतर पावसाचा व्यत्यय निर्माण झाला होता. त्यानंतर खेळ शक्य झाला नाही. शिखर धवनची ८७, तर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेची ६२ धावांची खेळी भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकविरोधातील दारुण पराभवामुळे विराटसेनेसाठी वेस्ट इंडिज दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या लढतीतही कामगिरीत सातत्य राखण्यावर त्यांचा भर असेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघावर नजर फिरवली तर त्यांच्याकडे अनुभवाची उणीव जाणवते. पण वेस्ट इंडिजची ही युवा सेना भारताला धक्का देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
उभय संघ -
भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि उमेश यादव.
वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), जोनाथन कॉर्टर, मिगुलएल कमिन्स, अल्जारी जोसेफ, जेसन मोहम्मद, किरन पॉवेल, केसरिक विल्यम्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, शाई होप, एविन लुईस, अॅश्ले नर्स व रोवमॅन पॉवेल.