ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 2 - काल रात्री झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत ट्वेंटी-20 मालिकेवरही कब्जा केला. बऱ्याच काळानंतर सुरेश रैनाने ट्वेंटी-20 क्रिटेटमध्ये केलेल्या अर्धशतकी खेळीने भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. या खेळीदरम्यान रैनाने 5 उत्तुंग षटकार कोठले. मात्र त्यातील एका षटकाराने स्टेडियममध्ये सामना पाहत असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलाला थेट रुग्णालयात पोहोचवले.
रैनाची फटकेबाजी सुरू असताना त्याने मारलेला एक फटका थेट स्टेडियममध्ये गेला. तेथे हा चेंडू एका पाच वर्षांच्या मुलाचा जांघेवर लागून त्याला दुखापत झाली. जखमी झालेल्या मुलाचे नाव सतीश असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला झालेली दुखापत किरकोळ असल्याचे निष्पन्न झाल्यावर किरकोळ उपचार करून त्या मुलाला रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र क्रिकेटवेड्या त्या मुलाने घरी जाण्याऐवजी पुन्हा स्टेडियममध्ये येत खेळ पाहणे पसंत केले.
6-year-old boy who got hit by Suresh Raina's sixer got minor injury on thigh; treated & discharged #INDvENGpic.twitter.com/FwAs4mIfKS— ANI (@ANI_news) February 1, 2017