बंगळुरू : गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यादरम्यान मंगळवारी आयपीएलच्या नवव्या पर्वात क्वालिफायरसाठी लढत होणार आहे. विक्रमासाठी उभय खेळाडूंदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात चार हजार धावांचा पल्ला गाठणारे रैना व विराट हे दोनच खेळाडू आहेत. रैनाने आतापर्यंत ४५ सामन्यांत ३४.१३ च्या सरासरीने ४०९६ धावा फटकावल्या आहेत, तर विराटने १३७ सामन्यांत ३८.२६ च्या सरासरीने ४०५६ धावा फटकावल्या आहेत. रैनाने एक शतक व २८ अर्धशतके ठोकली आहेत, तर विराटने चार शतके व २५ अर्धशतके झळकावली आहेत. विराटने चारही शतके यंदाच्या मोसमात ठोकली आहेत. चौकार-षटकार ठोकण्यात दोन्ही खेळाडू जवळजवळ बरोबरीत आहेत. रैनाने ३६० चौकार व १६० षटकार ठोकले, तर विराटने ३५४ चौकार व १४६ षटकार ठोकले आहेत. त्याने १४ सामन्यांत ९१९ धावा फटकावल्या आहेत. विराटने कामगिरीत सातत्य राखले, तर या स्पर्धेत एक हजार धावा फटकावण्याचा नवा विक्रम स्थापन होणार आहे. रैनाने यंदाच्या मोसमात १३ सामन्यांत ३९७ धावा फटकावल्या आहेत.
रैना-विराटमध्ये विक्रमासाठी चुरस
By admin | Published: May 24, 2016 4:25 AM