कोलंबो : ‘श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो,’ याकडे लक्ष वेधताना विश्वचषक विजेत्या संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने या एजंटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मला अधिकार दिल्यास या एजंटांना वठणीवर आणतोच, असेही रणतुंगा म्हणाला.या एजंटांवर कायदेशीर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचाही विचार रणतुंगाने बोलून दाखविला. एजंटांमुळेच देशतील क्रिकेटचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत झिम्बाब्वेकडून झालेला दारुण पराभव हा याचाच परिणाम असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. खेळाडू कर भरतात की केवळ पैसा देशाबाहेर घेऊन जातात, याचीही कठोर चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.२0१५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी रणतुंगा स्वत: समालोचनाची जबाबदारी पार पाडत होते. लंकेच्या गोलंदाजीवर त्यांनी सामन्यादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. रणतुंगा यांच्या आरोपांना भारतीय खेळाडूंनी फेटाळून लावले असून क्रिकेटपटू गौतम गंभीर याने रणतुंगाचे वक्तव्य अपमानजनक असल्याचे म्हंंटले आहे. अंतिम सामन्यात ९७ धावा करुन विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या गंभीरने रणतुंगा यांना पुराव्यानिशी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. विश्वविजेत्या संघाचा गोलंदाज आशिष नेहरा यानेही यावर नाराजी व्यकत करताना १९९६ च्या वर्ल्ड कपमधील त्यांच्या विश्वविजयावर मी प्रश्न उपस्थित करु शकतो, असे म्हंटले आहे. (वृत्तसंस्था)>२0११ च्या विश्वचषकातील पराभवाचीही चौकशी करा...२०११ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या पराभवाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील रणतुंगाने केली. माजी खेळाडू कुमार संगकारा याने रणतुंगावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना रणतुंगाने ही मागणी केली. २००९ मध्ये पाकिस्तानचा दौऱ्यात श्रीलंकेच्या संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. यानंतर संगकाराने हा दौरा कोणाच्या सहमतीने आखला गेला याची चौकशी करण्याची मागणी केली होती. संगकाराच्या आरोपांना रणतुंगाने जोरदार प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,‘ ‘जर संगकाराला पाकिस्तान दौऱ्याची चौकशी हवी असेल, तर ती नक्की झाली पाहीजे. सोबतच २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेमके काय घडले याचीही चौकशी व्हायला पाहिजे.
क्रिकेटपटूंच्या एजंटांवर बंदी घालण्याची रणतुंगा यांची मागणी
By admin | Published: July 15, 2017 12:41 AM