ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - भारत आणि ऑस्ट्रेलियात रांचीमध्ये सुरू असलेल्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली जखमी झाला असून त्याने मैदान सोडलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान ही घटना घडली आहे.
पहिल्या डावातील 40 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या चेंडूवर कांगारू फलंदाज हॅंड्सकॉम्बने मारलेला शॉट सीमारेषेकडे जात
असताना कोहलीने तो बॉल अडवण्यासाठी झेप घेतली. कोहलीने तो बॉल तर अडवला पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर कोहलीने मैदान सोडलं. कोहलीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नसली तरी तो मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विराट कोहलीच्या जागी राखीव खेळाडू अभिनव मुकुंद सध्या क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला आहे तर अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडतोय.
रांची कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वृत्त देईपर्यंत 59 षटकात ऑस्ट्रेलियाची 4 बाद 194 इतकी धावसंख्या झाली आहे. भारताकडून उमेश यादवने 2 तर अश्विन आणइ जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.