शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आरसीबीविरुध्द पुण्याचे पारडे जड

By admin | Published: April 29, 2017 12:42 AM

कोलकात्याकडून लाजिरवाण्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानाला जबरदस्त धक्का बसला आहे. याचा फायदा रायझिंग पुणे सुपरजायंट संघाला मिळाला

सुनील गावसकर लिहितात...

कोलकात्याकडून लाजिरवाण्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानाला जबरदस्त धक्का बसला आहे. याचा फायदा रायझिंग पुणे सुपरजायंट संघाला मिळाला असून त्यांना गुणतालिकेतआघाडी घेण्याची संधी आहे. आरसीबीकडे मजबूत फलंदाजी आहे. मात्र, खेळपट्टीचा फायदा गोलंदाजांना अधिक होत असल्याने त्यांचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. सलग दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर त्यांची ही कमकुवत बाजू प्रतिस्पर्धी संघांच्या लक्षात आली. ज्यावेळी चेंडू योग्य पद्धतीने वळायचा त्यावेळी त्यांची फलंदाजी ढेपाळत होती. आता उर्वरित सामन्यांत आरसीबी विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ तशाच प्रकारची खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न करतील. जेथे चेंडू उसळेल किंवा स्वीम मूव्हमेंट मिळेल. आरसीबीची ‘लाईन अप’ मोडून काढण्यासाठी हाच प्रयत्न केला जाईल. परंतु, क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी ही कल्पना योग्य ठरेल असे नाही. कोलकात्याविरुद्ध पुणे संघ अशीच तयारी करेल. मात्र, त्यांचा आत्मविश्वास आणि फॉर्म पाहता कोलकाता नाईट रायडर्सला रोखणे कठीण आहे. काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने उथप्पा फलंदाजी करायचा त्याच फॉर्ममध्ये तो परतलाय. जेव्हा तो टिच्चून फटके मारतो तेव्हा प्रतिस्पर्ध्यांसाठी महागडा ठरतो. संघासाठी ज्या पद्धतीचे योगदान गरजेचे आहे ते देण्याचे काम कर्णधार गौतम गंभीर करीत आहे. गेल्या सामन्यात धक्कादायक पराभवानंतर मुंबई इंडियन्सही विजयाचा मार्ग शोधत आहे. फलंदाजी क्रमात बदल करून कर्ण शर्माला आघाडीवर आणण्याचा ते प्रयत्न करतील. कोलकाता संघाने ज्या पद्धतीने नरेनला सलामीला आणले त्याच पद्धतीने मुंबईसुद्धा प्रयोग करेल. रॉयल चॅलेंजर्सवर सहज विजय मिळवणारा गुजरात संघही लयीत आहे. ब्रॅण्डन मॅक्क्युलम ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्यावरून त्यांनाही रोखणे कठीण आहे. अ‍ॅरोन फिंच आणि सुरेश रैना हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. नाथू सिंग हा गोलंदाजी विभाग सांभाळून आहे. बासील थम्पी संघाला सुरुवातीचे झटके देण्यास मदत करीत आहे. (पीएमजी)महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी मार्गावर येण्याचा प्रयत्न करतील. मात्र, मुंबईच्या तुलनेत पुणे संघासाठी हा शनिवार अधिक सोपा दिसत आहे.