नवी दिल्ली : स्ट्रायकर राणी रामपाल न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. बचावफळीतील सुशीला चानू उपकर्णधार असेल. पाच कसोटी सामन्यांची मालिका १४ मे पासून सुरू होत आहे. २० सदस्यांच्या संघात अनेक युवा आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश आहे. विश्व हॉकी लीगमध्ये सर्वोत्कृष्ट गोलकिपरचा पुरस्कार जिंकणारी सविता ही पहिली, तर रजनी दुसरी गोलकिपर असेल. सीनियर महिला संघाने यंदा बेलारुसला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर महिला हॉकी विश्व लीगच्या फायनलमध्ये चिलीवर विजय नोंदवित जेतेपद पटकविले होते. भारतीय संघगोलकिपर : सविता , रजनी ई, बचावफळी : दीप ग्रेस इक्का, उदिता, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशीला चानू , नमिता टोप्पो, मधली फळी : रितू राणी, लिलिमा मिंझ, नवज्योत कौर, मोनिका, रेणुका यादव, निक्की प्रधान, रीना खोकार आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, प्रीती दुबे, सोनिका, अनुपा बार्ला .
न्यूझीलंड दौऱ्यासाठी राणी रामपालकडे भारताचे नेतृत्व
By admin | Published: May 05, 2017 12:57 AM