शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

रणजी फायनल - मुंबई की गुजरात...कोण मारणार बाजी ?

By admin | Published: January 14, 2017 11:49 AM

रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर 312 धावाचं आव्हान ठेवलं आहे

ऑनलाइन लोकमत
इंदूर , दि. 14 - रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर 312 धावाचं आव्हान ठेवलं आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणा-या गुजरातने 47 धावांवर बिनवाद अशी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर गुजरातने आपले तीन विकेट्स गमावले असून सध्या जुनेजा आणि पार्थिव पटेल खिंड लढवत आहे. पार्थिव पटेलने 72 चेंडूत अर्धशतक पुर्ण केलं आहे. सामना अटीतटीचा होण्याची शक्यता असून बाजी नेमकी कोण मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. पहिल्या सत्राअखेर गुजरातने तीन विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत. विजयासाठी गुजरातला 166 धावांची गरज आहे.
 
मुंबईने गुजरातसमोर ठेवलेलं 312 धावाचं लक्ष्य पुर्ण केल्यास हा एक रेकॉर्ड असेल. इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला आहे.. सोबतच पहिल्यांदा रणजी जिंकण्याची संधी गुजरातकडे आहे. दुसरीकडे मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. 
 
गतविजेते संघ - 
२०१५-१६ - कर्नाटक 
२०१३-१४  - कर्नाटक
२०१२-१३  - मुंबई
२०११-१२ - राजस्थान 
 
रणजी करंडक सांघिक विक्रम
- सर्वात जास्त विजय - ४० (मुंबई)
- सर्वात जास्त धावा - ९४४/६ (घोषित) - हैद्राबाद वि. आंध्र - १९९३-९४
- सर्वात कमी धावा - २१/१० - हैद्राबाद वि. राजस्थान - २०१०
 
खेळाडूंचे विक्रम
- सर्वात जास्त धावा - ४४३ नाबाद - बी.बी.निंबाळकर - महाराष्ट्र वि. काठेवाड (सौराष्ट्र) - १९४८-४९
- सर्वात चांगली गोलंदाजी (डाव) - १०/२० - प्रेमांशू चटर्जी - बंगाल वि. आसाम - १९५६-५७
- सर्वात चांगली गोलंदाजी (सामना) - १६/९९ - अनिल कुंबळे- कर्नाटक वि. केरळ - १९९४-९५
 
दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली.
 
चौथ्या दिवशी ३ बाद २०८ धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. अष्टपैलू अभिषेक नायरने पुन्हा एकदा मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी करताना १४६ चेंडूत ५ चौकार व ५ षट्कारांसह ९१ धावांची खेळी केली. कर्णधार आदित्य तरेनेही सावधपणे खेळताना ११४ चेंडूत १२ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. यादव आणि तरे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. पुन्हा एकदा सिद्धेश लाड (१५) अपयशी ठरला, तर, बलविंदर संधू (२०), शार्दुल ठाकूर (१) आणि विशाल दाभोळकर (१२) दडपणाखाली बाद झाले.
 
चिंतन गजाने मुंबईकरांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२१ चेंडूंत सहा बळी घेतले. आरपी सिंगने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली, तर रुष कलारिया आणि हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
 
यानंतर, मोठ्या धावसंख्येचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने चांगली सुरुवात केली. समित गोहेल याने सावध भूमिका घेत खेळपट्टीवर टिकून राहण्यावर भर दिला. दुसऱ्या बाजूने प्रियांक पांचाळने खराब चेंडूंचा चांगला समाचार घेताना गुजरातचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या जोरावर गुजरातने चौथ्या दिवअखेर १३.२ षटकांत बिनबाद ४७ धावांची मजल मारली होती.