शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रितीका, आकांक्षाचे विक्रमासह सुवर्ण

By admin | Published: February 03, 2015 1:15 AM

जलतरण, डाईव्हिंग, कुस्ती आणि नेमबाजी प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करून ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : जलतरणमध्ये महिलांच्या मिडले रिलेत नवीन उच्चांकतिरुअनंतपुरम : महाराष्ट्रच्या पथकावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानासुद्धा संघातील खेळाडूंनी आपली मानसिकता ढळू न देता जलतरण, डाईव्हिंग, कुस्ती आणि नेमबाजी प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करून ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. *जलतरणमध्ये आजसुद्धा महाराष्ट्राच्या महिलांनी निर्विवाद वर्चस्व राखले. महिलांच्या ८०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात ९:१५.३० अशी विक्रमी वेळ नोंदवित सुवर्णपदक जिंकले. तिने २०११च्या ऋचा मिश्राचा ९:२४.४५ वेळेचा विक्रम मोडीत काढला. या प्रकारात मोनिका गांधीला ९:२९.२३ वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)दररोज चार ते पाच तास कसून सराव, शारिरीक क्षमता टिकविण्यासाठी घेतलेली मेहनत या मुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध शक्य झाला. कामगिरीत सातत्य राखताना कोठे कमी पडते याचा अभ्यास केला. त्याप्रमाणे चुका टाळण्यावर भर दिला. सरावत तशी प्रगती दिसत असल्याने सुवर्ण पदक मिळणे अपेक्षितच होते. - पूजा घाटकर, आंतरराष्ट्रीय नेमबाजच्महिलांच्या डाईव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या रितीका श्रीरामने नवा राष्ट्रीय विक्रम करताना २३० गुणांची नोंद करून सुवर्णपदक तर दीप्ती पन्वरने २२१ गुणांसह रौप्यपदक जिंकले.च्महिलांच्या नेमबाजीत १० मीटर रायफल प्रकारात महाराष्ट्राची पूजा घाटकरने वैयक्तिक गटात २०८.१ गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकले. तिने सांघिक गटातसुद्धा अंजली भागवत, अयोनिका पॉल यांच्यासह अचूक नेम साधून सुवर्णपदकाचा डबल धमाका केला. महा खो-खो : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची आगेकूचच्श्रीपादम स्टेडियम येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघानी गटातील आपले सामने डावाच्या फरकाने जिंकून विजयी घौडदौड सुरू ठेवली, पुरूष संघाने पुड्डूचेरीचा, तर महिलांनी आंध्रप्रदेश संघाचा पराभव केला.च्पुरूषांच्या ‘अ’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने पुड्डूचेरीचा (२२-३, ०-३), २२-६ असा १ डाव व १६ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या अमोल जाधवने २.३० मि संरक्षण करून आक्रमणात ४ गडी टिपले त्याला नरेश सावंत (२.३० मि. नाबाद), दिपेश मोरे (२.१५मि), प्रयाग कनगुटकर (२.५०मि) व राहूल घुटे (२.१०मि) यांनी छान साथ दिली, आक्रमणात बाळासाहेब पोकार्डे व युवराज जाधवने प्रत्येकी ४ गडी तर मनोज पवारने ३ गडी टिपले.च्महिहलांच्या ‘ब’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेश वर (८-२, ०-२), ८-४ अशी १ डाव व ४ गुणांनी मात केली. प्रियांका येळे (४मि), सारिका काळे (३.३०मि नाबाद), श्वेता गवळी (३.३०मि), सुप्रिया गाढवे (३.३०मि), कविता घाणेकर (२.३०मि), श्रुती सकपाळ (२मि नाबाद) व मिनल भोईर (३ गडी) या विजयाचा प्रमुख शिल्पकार होत्या.च्महिलांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिलेमध्ये महाराष्ट्राच्या आरती घोरपडे, मोनिका गांधी, ज्योत्स्ना पानसरे व अदिती घुमटकर या चार जलपरींनी ४:३२.३८ अशी वेळ नोंदविताना नवीन विक्रमाची नोंद करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. च्कन्नूर येथे सुरूअसलेल्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारात पुरुषांत ९८ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या महेश मोहोळने रौप्य पदक मिळवले.