नवी दिल्ली : बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी सोपविली. माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राहुल द्रविड हे भारतीय ‘अ’ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत.बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील. कोचपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांना माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कडवे आव्हान दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, कर्णधार विराट कोहली याने आधीही रवी शास्त्री यांना कोच बनवा, असे टिष्ट्वट केले होते. त्याची पसंती लक्षात घेऊन शास्त्री यांना झुकते माप देण्यात आले.भारताकडून २०१४ मध्ये अखेरचा सामना खेळणारा झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो. (वृत्तसंस्था)>तिसऱ्यांचा टीम इंडियासोबतशास्त्री हे तिसऱ्यांदा टीम इंडियासोबत अधिकारी म्हणून जुळत आहेत. याआधी २००७ मध्ये ते बांगलादेश दौऱ्याच्या वेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्यानंतर आॅगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीसाठी संघाचे संचालक राहिले. याच काळात भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात पराभूत करीत मालिका जिंकली होती. २०१५ चा विश्वचषक आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकातदेखील संघाने उपांत्य फेरी गाठली होती.
रवी शास्त्री मुख्य कोच
By admin | Published: July 12, 2017 12:33 AM