अहमदाबाद : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने गुजरातमधील जुनागडच्या वन्यजीव अभयारण्यात वाघासोबत सेल्फी काढल्यावरून गुजरातच्या वन विभागाने त्याला २० हजारांचा दंड ठोठावला. कायद्यानुसार असे करणे गुन्हा आहे.जुनागडचे मुख्य वन संरक्षक ए. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार जडेजा सध्या बाहेर असल्याने त्याच्यावतीने त्याचे सासरे हरदेवसिंग सोळंकी यांनी साक्ष देऊन दंड भरला. तपास अहवाल अद्याप अधिकाऱ्यांकडे पाठविलेला नाही. जूनमध्ये वनपरिसर बंद असताना जडेजाने वाघासोबत सेल्फी काढला. याबद्दल त्याला दंड आकारण्यात आला आहे. अलीकडे विवाहबद्ध झालेला जडेजा व त्याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच १७ जून रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले. छायाचित्रात दोघेही वाघापुढे सेल्फी काढताना दिसत आहेत.
रवींद्र जडेजाला २० हजारांचा दंड
By admin | Published: August 10, 2016 4:19 AM