सध्या भारतीय संघ इंग्लंड दौ-यावर असून पहिल्या कसोटीत रविंद्र जाडेजा आणि जेम्स अँडरसन यांच्यात वाद निर्माण झाला होता. अँडरसनने जाडेजाला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केली होती. याविरोधात भारतीय संघ व्यवस्थापनाने आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. भारताने तक्रार दाखल केल्यावर इंग्लंड संघ व्यवस्थापनानेही जाडेजाविरोधात तक्रार दाखल केली होती. आचारसंहितेच्या लेव्हल २ च्या शिस्तभंगाचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले होते. या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही खेळाडू, त्यांचे वकिल, प्रत्यक्षदर्शी तसेच बीसीसीआय आणि ईसीबीचे अधिकारी या सुनावणीसाठी उपस्थित होते. सुमारे १५० मिनीटे चाललेल्या या सुनावणीत पंचांनी व्हिडीओ फुटेजही तपासले. यात पंचांनी जाडेजाला लेव्हल १ च्या शिस्तभंगात दोषी ठरवले. यानुसार जाडेजाला मॅच फीच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे. 'दोन्ही खेळाडूंमध्ये जे भांडण झाले ते खेळभावनेविरोधात होते. असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे' असे मतही पंचांनी नोंदवले.
अँडरसन वादाप्रकरणी रविंद्र जाडेजा दोषी, मॅच फीच्या ५० टक्के दंड
By admin | Published: July 25, 2014 5:04 PM
इंग्लंडच्या जेम्स अँडरसनशी वाद घातल्यामुळे गोत्यात आलेला भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाला आयसीसीच्या आचारसंहितेतील लेव्हल १ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे.
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५- इंग्लंडच्या जेम्स अँडरसनशी हमरीतुमरी झाल्याने गोत्यात आलेला भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाला आयसीसीच्या आचारसंहितेतील लेव्हल १ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. आयसीसीने जाडेजाला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड आकारला असून या निर्णयावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे.