शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

आरसीबी आणि २३ एप्रिलचा अजब योगायोग

By admin | Published: April 24, 2017 1:50 AM

क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला. सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला

बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला.  सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलमधील सर्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्याबरोबरच जुळून आला एक अजब आणि विचित्र योगायोग. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च आणि निचांकी अशा दोन्ही धावसंख्याचे विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवले गेले आहेत. विचित्र बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम एकाच दिवशी म्हणजे २३ एप्रिलला नोंदवले गेले आहेत.
बरोबर चार वर्षांपूर्वी २३ एप्रिल २०१३ दिवशी ख्रिस गेलच्या तुफानाने आयपीएल आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला होता. त्याच्या १७५ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूने ५ बाद २६३ ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. आता चार वर्षांनी २३ एप्रिल याच दिवशी बंगळुरूच्या नावावर सर्वबाद ४९ हा आयपीएलमधील सर्वात निचांकी धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवला गेलाय. 
त्यानिमित्ताने एखाद्याशी क्रिकेट कसा क्रूर खेळ खेळू शकतो. यशोशिखरावर असलेल्याला पार सागरतळाला कसा पाठवू शकतो, हे आज इडन गार्डनवर दिसले. ऐतिहासिक इडन गार्डनवर कोलकात्याला १३१ धावांत गुंडाळल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सहज जिंकेल, असाच सर्वांचा होरा होता. पण प्रत्यक्षात मैदानावर जे काही घडले, त्याची कुणीही कल्पना केली नसेल. 
 अजून एक योगायोग म्हणजे आठ वर्षांपूर्वी २००९ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळतानाच राजस्थान रॉयल्सवर सर्वबाद ५८ या आयपीएलमधील तेव्हाच्या निचांकी धावसंख्येवर गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. 
त्या सामन्यातले दोन खेळाडू आजही खेळले. ते म्हणजे विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा. फरक एवढाच की त्या सामन्यात दोघेही एकाच संघात होते. तर आज एकमेकामविरुद्ध. 
बंगळरुच्या दुर्दैवाने या योगायोगांची मालिका येथेच संपत नाही. आयपीएलमध्ये सर्वात प्रथम १०० हून कमी धावांत गारद होण्याची नामुष्की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरच ओढवली होती. त्यावेळीही कोलकाता नाइटरायडर्सचा संघच प्रतिस्पर्धी होता. १८ एप्रिल २००८ साली झालेल्या त्या सामन्यात आरसीबीचा संघ अवघ्या ८२ धावांत गारद झाला होता. आता आयपीएलमध्ये ५० हून कमी धावांत गारद होणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्कीही आरसीबीवरच ओढवलीय. पुन्हा समोर प्रतिस्पर्धी कोलकाता नाइटरायडर्स.
एकंदरीत आजच्या पराभवाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आत्मविश्वासाला जबर धक्का पोहोचला असेल, त्यामुळे पुढच्या सामन्यापूर्वी त्यातून सावरणे आरसीबी आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खूप कठीण जाणार आहे.