शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

आरसीबी काढणार का पराभवाचे उट्टे

By admin | Published: May 07, 2017 12:42 PM

आयपीएलच्या दहाव्या सत्रात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सचा या आधीच्या सामन्यात विराट सेनेला दारुण पराभव स्विकारावा लागला होता.

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत
बंगळुरु, दि. 7 - आयपीएलच्या दहाव्या सत्रात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सचा या आधीच्या सामन्यात विराट सेनेला दारुण पराभव स्विकारावा लागला होता. ४९ या निचांकी धावसंख्येची नोंद आरसीबीने केली होती. त्यामुळे तळाच्या स्थानावर असलेला आरसीबी आता केकेआरवर या पराभवाचे उट्टे काढणार का, केकेआरला प्लेआॅफमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. त्यामुळे केकेआर फॉर्ममध्ये नसलेल्या या संघावर पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
या आधीच्या सामन्यात केकेआरच्या डी ग्राण्ड होमचा भेदक मारा कोहली विसरणार नाही. त्याने फक्त १० चेंडूत चार धावा देत ३ गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. तर कुल्टर नाईल, उमेश यादव, ख्रिस व्होक्स यांना तोंड देताना आरसीबीचा दाणदाण उडाली होती. या चौकडीने आरसीबीला  आसमान दाखवले होते.
 
गौतम गंभीरच्या आक्रमक नेतृत्वाने इतर संघांना अडचणीत आणले आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असो किंवा कमी धावसंख्येचा बचाव, गंभीर मैदानावर आपल्या रणनितीचा अमंल योग्य पद्धतीने करण्यात आतापर्यंत अपवाद वगळता
यशस्वी ठरला आहे. सुनील नरेन, ख्रिस लीन यांना पार्ट टाईम ओपनर म्हणून पाठवल्यानंतर एक चांगली सुरूवात केकेआरला मिळते. त्याचा फायदा घेत गंभीर आणि उथप्पा संघाला मोठी धावसंख्या उभारुन देतात. मधली फळी मनिष पांडे आणि युसुफ
पठाणमुळे मजबूत आहे. सुर्यकुमार यादव आणि शेल्डन जॅक्सन यांच्यापैकी ज्याला संधी मिळेल त्याला मात्र त्याचे सोने करावे लागेल. फलंदाजीतील उच्चांक गाठणा-या आरसीबीला आता निचांकी धावसंख्या पहावी लागत आहे.  गोलंदाजीचा विचार करता शेन वॉटसन हा स्पर्धेत संघासाठी फायदेशीर ठरलेला नाही. त्याने नेहमीच जास्त धावा दिल्या आहेत. त्या ऐवजी चहल,
अनिकेत चौधरी, पवन नेगी, सॅम्युअल बद्री हे फायदेशीर गोलंदाज ठरले आहेत. प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या आरसीबीला या सामन्यातील पराभवाने गमावण्यासारखे काहीही नाही. मात्र त्यांचा हा तेरावा सामना असल्याने या स्पर्धा संपण्यापुर्वी किमान सन्मानजनक निरोप घ्यावा, अशी अपेक्षा विराट कोहली नक्कीच बाळगून असले.