शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

आरसीबीचा धमाकेदार विजय

By admin | Published: April 13, 2016 3:07 AM

कर्णधार विराट कोहली, धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स आणि युवा सर्फराझ खान यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने

बंगळुरू : कर्णधार विराट कोहली, धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स आणि युवा सर्फराझ खान यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आयपीएलमध्ये विजयी सलामी देत सनरायझर्स हैदराबादला ४५ धावांनी नमवले. एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बँगलोरने निर्धारित षटकांत ४ बाद २२७ धावांचा हिमालय उभारला. कोहली व एबीचे तडाखेबंद अर्धशतक आणि सर्फराझने दिलेला तडाखा यांमुळे हैदराबादची मजबूत धुलाई झाली. या अशक्यप्राय धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादने २० षटकांत ६ बाद १८२ धावांची मजल मारली.वेगवान सुरुवात केल्यानंतर दबावाखाली आलेल्या हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक लागला. सलामीवीर शिखर धवन केवळ ८ धावांवर बाद झाला, तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आक्रमक अर्धशतक फटकावताना २५ चेंडंूत ४ चौकार ५ षटकारांसह ५८ धावा कुटल्या. वॉर्नर मैदानात असेपर्यंत बँगलोरच्या खेळाडूंवर दबाव होता. मात्र, परवेझ रसूलने वॉर्नरचा त्रिफळा उडवताना हैदराबादला मोठा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने हैदराबादचे फलंदाज बाद होत राहिले. सर्वच प्रमुख फलंदाज दबावाखाली अपयशी ठरले. इआॅन मॉर्गन (नाबाद २२), आशिष रेड्डी (३२) आणि कर्ण शर्मा (नाबाद २६) यांनी थोडाफार प्रतिकार केला; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. शेन वॉटसन आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तत्पूर्वी, कोहली आणि एबी यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या तडाखेबंद १५७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकांत ४ बाद २२७ धावांचा डोंगर उभारला. कोहली आणि एबी यांनी तुफानी हल्ला चढवताना आक्रमक अर्धशतक झळकावून हैदराबादच्या गोलंदाजीची पिसे काढली; पण डाव गाजवला तो युवा फलंदाज सर्फराझ खानने. त्याने जोरदार फटकेबाजी करताना केवळ १० चेंडूंत नाबाद ३५ धावांचा तडाखा देऊन संघाला २००चा पल्ला गाठून दिला. ख्रिस गेल स्वस्तात बाद झाल्यानंतर कोहलीने ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार ठोकताना ७५ धावांची धुवाधार खेळी केली. तर, एबीने ४२ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ८२ धावा चोपल्या. अखेरच्या क्षणी सर्फराझने धमाकेदार फलंदाजी करताना हैदराबादच्या गोलंदाजीतील हवाच काढली. संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ४ बाद २२७ धावा (एबी डिव्हीलियर्स ८२, विराट कोहली ७५, सर्फराझ खान नाबाद ३५; मुस्तफिझूर रहमान २/२६, भुवनेश्वर कुमार २/५५) वि. वि. सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १८२ धावा (डेव्हिड वॉर्नर ५८, आशिष रेड्डी ३२, कर्ण शर्मा नाबाद २६, इआॅन मॉर्गन नाबाद २२; शेन वॉटसन २/३०, यजुवेंद्र चहल २/४३).