शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

आरसीबीचा रोमांचक विजय

By admin | Published: May 09, 2016 11:50 PM

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दडपणाखाली आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अवघ्या एका धावेने नमवून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने थरारक विजय मिळविला

मोहाली : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दडपणाखाली आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अवघ्या एका धावेने नमवून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने थरारक विजय मिळविला. अखेरच्या षटकात १७ धावांची आवश्यकता असताना पंजाबला ख्रिस जॉर्डनच्या षटकात १५ धावा काढता आल्या. आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये झालेल्या या थरारक सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान पंजाबने बँगलोरला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. बँगलोरने एबी डिव्हिलियर्सच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १७५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची झुंज अवघ्या एका धावेने अपुरी पडली. कर्णधार मुरली विजयने ५७ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह शानदार ८९ धावांची खेळी करून पंजाबच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, शेन वॉटसनने त्याला बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. हाशिम आमला (२१), वृद्धिमान साहा आणि डेव्हिड मिल्लर (०) विशेष चमक न दाखवता परतल्यानंतर मार्कस स्टोइनीसने २२ चेंडंूत ३४ धावा तडकावून संघाला विजयी मार्गावर नेले. परंतु, अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना त्याला केवळ २ धावा काढण्यात यश आले.तत्पूर्वी, लोकेश राहुल व कर्णधार विराट कोहली यांनी संघाला ६३ धावांची आक्रमक सलामी दिली. मात्र, केसी करिअप्पाने आठव्या षटकात तिसऱ्या व पाचव्या चेंडूवर अनुक्रमे राहुल व कोहलीला बाद करून पंजाबला मजबूत पकड मिळवून दिली. राहुलने २५ चेंडंूत ६ चौकार व एका षटकारासह ४२ धावा चोपल्या. कोहलीने २१ चेंडंूत २० धावा काढल्या. वॉटसनही झटपट बाद झाल्याने बँगलोरची ३ बाद ६७ अशी अवस्था झाली. परंतु, डिव्हिलियर्स व सचिन बेबी यांनी ८८ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. डिव्हिलियर्सने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६४ धावा फटकावल्या. बेबीने २९ चेंडूंत ३३ धावा केल्या. ासंक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ६ बाद १७५ धावा (एबी डिव्हिलियर्स ६४, लोकेश राहुल ४२, सचिन बेबी ३३; केसी करिअप्पा २/१६, संदीप शर्मा २/४९) वि.वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ४ बाद १७४ धावा (मुरली विजय ८९, मार्कस स्टोइनीस ३४; शेन वॉटसन २/२२).