(वाचली) कोल्हापूर पब्लिक स्कूलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By admin | Published: November 22, 2014 11:30 PM
कोल्हापूर : धौलपूर (राजस्थान) येथे झालेल्या १९ वर्षांखालील वेस्ट झोन सी.बी.एस.ई. हॉकी स्पर्धेतील मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर पब्लिक स्कूलने महिसाना (गुजरात) संघावर मात करीत रामपूर (उत्तर प्रदेश) येथे होणार्या सी.बी.एस.ई.च्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत प्रवेश मिळविला.
कोल्हापूर : धौलपूर (राजस्थान) येथे झालेल्या १९ वर्षांखालील वेस्ट झोन सी.बी.एस.ई. हॉकी स्पर्धेतील मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर पब्लिक स्कूलने महिसाना (गुजरात) संघावर मात करीत रामपूर (उत्तर प्रदेश) येथे होणार्या सी.बी.एस.ई.च्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत प्रवेश मिळविला.वेस्ट झोन सी.बी.एस.ई. हॉकी स्पर्धेत ४२ संघांचा समावेश होता. विजयी संघात प्रतीक शहा (कर्णधार), ज्योतिरादित्य इंगवले (गोलकीपर), दिगंबर पाटील, केतन जाधव, रणजित चव्हाण, शुभंकर भालकर, श्रीराम पाटील, हर्षवर्धन पाटील, ज्योतिरादित्य शिंदे, आयुष बेनाडे, सुयोग सावंत, सृजन शिंदे, आर्य सूर्यवंशी, हर्षवर्धन मोहिते, ऋतुराज काळवेकर यांचा समावेश होता. या संघाला तेजस पाटील, महेश लोहार, पुष्कराज पाटील, दिग्विजय पाटील, मंदार रेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका शुभांगी पवार, व्यवस्थापक, प्रशिक्षक विजय मनुगडे, केदार गुरव, सुचेता भालकर यांचे प्रोत्साहन लाभले. ----------------------------फोटो ओळी : राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलांच्या हॉकी संघासोबत अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका शुभांगी पवार, व्यवस्थापक, प्रशिक्षक विजय मनुगडे, केदार गुरव, सुचेता भालकर उपस्थित होते. २२११२०१४- कोल- पब्लिक