नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा:या टेरी वॉल्श यांनी पुन्हा टीम इंडियाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आह़े मात्र, यासाठी हॉकी इंडियाने पुढाकार घेणो गरजेचे आहे, असेही ते म्हणाल़े
वॉल्श यांनी मान्य केले की, केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांना पत्र लिहून भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आह़े मात्र, पुन्हा आता वॉल्श यांना प्रशिक्षकपदावर घ्यायचे किंवा नाही हा निर्णय हॉकी इंडियाच घेऊ शकत़े
वॉल्श पुढे म्हणाले, मी सोमवारी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांना पत्र लिहून पुन्हा प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आह़े तसेच 2क्16 मध्ये होणा:या रिओ ऑलिम्पिकर्पयत काम करण्याची इच्छासुद्धा बोलून दाखविली आह़े मात्र, आता यावर निर्णय घेण्यासाठी हॉकी इंडियाला पुढाकार घ्यावा लागेल़ वॉल्श यांच्या प्रशिक्षकपदाखाली हॉकी संघाने इंचियोन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत 16 वर्षानंतर सुवर्णपदकांची कमाई केली होती़ यानंतर वॉल्श यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ विशेष म्हणजे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्र यांनी अमेरिकेच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक असताना वॉल्श यांनी आर्थिक घोटाळा केला होता, असा आरोप केला होता़ आता वॉल्श यांनी बत्र यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आह़े (वृत्तसंस्था)