शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

केकेआरची खरी परीक्षा मुंबईविरुद्धच

By admin | Published: May 11, 2017 12:39 AM

आयपीएलचे यंदाचे सत्र निर्णायक वळणावर पोहोचले आहे. केकेआरची आघाडीच्या चार संघांत स्थान मिळविण्याची धडपडदेखील सुरू आहे.

सौरभ गांगुली लिहितो...आयपीएलचे यंदाचे सत्र निर्णायक वळणावर पोहोचले आहे. केकेआरची आघाडीच्या चार संघांत स्थान मिळविण्याची धडपडदेखील सुरू आहे. केकेआर ‘नॉक आऊट’मध्ये स्थान मिळवेल, अशी मला खात्री आहे. पण, मुंबईविरुद्ध केकेआरचा पराभव झाल्यास आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्, सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने आपापले सामने जिंकल्यास केकेआरला धावसरासरीवर विसंबून राहावे लागेल. केकेआरला ही परिस्थिती ओढवून घेणे परवडण्यासारखे नाही. मुंबई इंडियन्स पकड कायम ठेवण्याच्या निर्धाराने उतरणार असून विजयासह साखळी सामने संपवायचे आणि गुणतालिकेत नंबर वन बनायचे असा संघाचा प्रयत्न आहे. केकेआरच्या सलामीला सुनील नारायण धडाका करीत असला तरी पुढील सामन्यात डावाचा प्रारंभ गौतम गंभीरकडूनच करण्याचे संघाचे प्रयत्न असतील. गंभीर खेळपट्टीवर स्थिरावल्यास दुसऱ्या टोकावर असलेल्या ख्रिस लीनसोबत सामना संपवू शकतो. ईडनच्या नव्या खेळपट्टीवर गोलंदाजांना उसळी आणि वेग दोन्ही मिळविणे शक्य होत आहे. मुंबई इंडियन्सला हेच हवे आहे. पोलार्ड, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि नीतेश राणा हे सर्व जण चेंडू बॅटवर घेणे पसंत करतात. मुंबई संघ या स्पर्धेत गोलंदाजी व फलंदाजीत सर्वाधिक संतुलित आहे. बुमराह, जॉन्सन, मॅक्लेनघन, मलिंगा असे एकाहून एक सरस गोलंदाज असून फिरकीसाठी अनुभवी हरभजन आहेच. मुंबईकडे फलंदाजीतही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हार्दिक पांड्यासारखा फलंदाज सातव्या किंवा आठव्या स्थानावर खेळायला येत आहे. केकेआर गोलंदाजीचा वापर कसा करतो, हे पाहणे रंजक ठरेल. केकेआरकडे उमेश यादव, कुल्टर नाईल आणि बोल्टसारखे वेगवान गोलंदाज आहेत. या सर्वांनी आरसीबीला उद्ध्वस्त केले होते. नारायण आणि कुलदीप यादवसारख्यांना कसे विसरता येईल. केकेआरविरुद्ध मुंबई या लढतीत उभय संघाच्या संयमाची परीक्षा असेल. जो संघ अखेरपर्यंत संयम टिकवेल, तो बाजी मारण्यात यशस्वी ठरेल. किंग्ज पंजाबने केकेआरला कडवे आव्हान देत चकित केले. पण अखेरच्या ४ संघांत कायम राहण्यासाठी त्यांना अखेरचे दोन्ही सामने जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. सनरायझर्सला पावसाच्या व्यत्ययामुळे थोडा लाभ झालेला दिसतो. तरीही गतविजेता असलेला हा संघ ‘मस्ट विन’ स्थितीत आहे. गुरुवारी सनरायझर्सला विजय मिळविण्याशिवाय पर्याय नाही. (गेमप्लान)