शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

देविंदरला वगळण्यामागे ठोस कारणे, क्रीडा महासंघांमधील अनागोंदी खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:43 AM

‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’(टॉप्स) या योजनेत खेळाडूंना योग्यतेच्या आधारेच स्थान दिले जाते. दुसरीकडे भालाफेकपटू देविंदरसिंग कांग याला वगळण्यामागे ठोस कारणे असल्याची माहिती क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांनी दिली.

नवी दिल्ली : ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’(टॉप्स) या योजनेत खेळाडूंना योग्यतेच्या आधारेच स्थान दिले जाते. दुसरीकडे भालाफेकपटू देविंदरसिंग कांग याला वगळण्यामागे ठोस कारणे असल्याची माहिती क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांनी दिली.देविंदरने मागील महिन्यात विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत अंतिम फेरी गाठली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. तथापि, टॉप्समधून वगळल्याबद्दल निराशा व्यक्त करीत त्याने इटलीला प्रस्थान करण्याचा विचार बोलून दाखविला. श्रीनिवास यांनी मात्र देविंदरच्या निराशेकडे दुर्लक्ष करीत सांगितले की, टॉप्समध्ये कुणाला स्थान मिळण्याची योग्यता, ही त्याची वैयक्तिक कामगिरीच असते. विश्व चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठल्यानंतरही त्याला योजनेतून वगळण्यामागे काही ठोस कारणे आहेत; पण मी या कारणांचा खुलासा करणार नाही. क्रीडा मंत्रालय देविंदरचा फेरविचार करू शकेल. त्याला वगळण्याचा निर्णय भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ व क्रीडा मंत्रालयाने घेतला. भविष्यात त्याला योजनेत स्थान मिळू शकते. ’देविंदरने विश्व स्पर्धेत कांस्य जिंकले होते. टॉप्समध्ये स्थान मिळावे, यासाठी १ आॅक्टोबर रोजी क्रीडामंत्र्यांपुढे तो कैफियत मांडणार आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी मुलाखतीची माहिती नसल्याचे स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)‘स्पोर्टस् फॉर आॅल’या विषयावरील राष्टÑीय कार्यशाळेत बोलताना क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी राष्टÑीय क्रीडा महासंघांमधील बेशिस्त आणि अनागोंदी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. खेळाचे संचालन प्रामाणिक हेतूनेच व्हायला हवे, असे सांगून राठोड म्हणाले, ‘खेळात कुठलेही कुप्रशासन असू नये. संघ निवड आणि निकाल यात प्रामाणिकपणा बाळगावाच लागेल. सर्व माहिती जनतेपुढे यायलाच हवी, यावर मंत्रालय ठाम आहे. मंत्रालय धोरण आखेल, पण अंमलबजावणी व्यावसायिकपणेच व्हायला हवी. सर्व योजनांवर नजर ठेवण्यासाठी आम्ही सीईओ नेमण्याचा विचार करीत आहोत. २४ बाय ७ आणि ३६५ दिवस खेळात काय चालले आहे हे पाहणे, शिवाय हाय परफॉर्मन्स मॅनेजर्स आणि कोचेस यांच्या कामावरही नजर ठेवण्याचे काम होणार आहे.’

टॅग्स :Sportsक्रीडा