नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्रीडा मंत्रालयाने ५४ राष्ट्रीय क्रीडा महासंघांना बहाल केलेली अस्थायी मान्यता गुरुवारी पुन्हा गोठवली. न्यायालयाने पुढील निर्णयापर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने आदेश दिला. मात्र मंत्रालयाने आदेशाकडे डोळेझाक करीत अस्थायी मान्यता बहाल केली होती.न्यायालयाने बुधवारी दोन दिवसात परिस्थिती स्पष्ट करण्याचे आदेश देताच क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव एसपीएस तोमर यांनी साईचे संचालक संदीप प्रधान यांना पत्र लिहून २ जून रोजी ५४ महासंघांना ३० सप्टेंबरपर्यंत अस्थायी मान्यता देण्याचा मंत्रालयाचा आदेश मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.क्रीडा मंत्रालय दरवर्षी महासंघांना वर्षभरासाठी मान्यता प्रदान करते, मात्र यंदा सहा महिन्यासाठी अस्थायी मान्यता दिली होती. (वृत्तसंस्था)
५४ राष्ट्रीय महासंघांची मान्यता पुन्हा गोठवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 2:20 AM