ऑनलाइन लोकमतधरमशाला , दि. 27 - भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनी याचा विक्रम वृद्धिमान साहाने मोडला आहे. धोनीने कसोटीतून निवृती घेतल्यानंतर वृद्धिमान साहाकडे पुर्णवेळ विकेटकिपरची जबाबदारी आली आहे. ती जाबाबदारी त्याने चांगल्या पद्धतीने निभावल्याचे दिसतं आहे. धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात साहाने हा विक्रम केला आहे. यष्टीरक्षण करताना साहाने विकेटच्या पाठीमागे एका मोसमात स्टपिंग आणि झेल घेण्याचा धोनीचा विक्रम मोडला आहे. साहाने कसोटी सामन्यात 2016-17 च्या मोसमात 26 जणांना माघारी पाठवत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. माजी भारतीय कर्णधार आणि विकेटकिपर धोनीने 2012-13च्या मोसमात 24 जणांना तंबूत पाठवलं होतं. या यादीत सय्यद किरमानी यांचा अव्वल क्रमांक लागतो. त्यांनी 1979-80 या मोसमात 35 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं.
सध्या दुसऱ्या डावात 106 धावांचा पाठलाग करताना भारताने नाबाद19 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजून 87 धावांची गरज आहे. चौथा कसोटी सामना जिंकून भारत मालिकाही खिशात घालण्याच्या स्थितीत आहे.