पुणे : लिएंडर... लिएंडर... इंडिया... इंडिया... अशा घोेषणांनी आणि शिट्यांनी क्रीडानगरीतील टेनिसचे स्टेडियम दुमदुमून गेले. याचबरोबर तिरंगी झेंडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून फडकाविले जात होते. लिएंडर जेव्हा या लढतीसाठी कोर्टवर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून येत होता. त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून तो नक्की दुहेरीचा सामना जिंकेन, असे वाटत होते. कोर्टवर आल्यानंतर लिएंडरने हात वर करून प्रेक्षकांना अभिवादन केले त्यावेळेस एकच जल्लोष झाला. त्याचा खेळ पाहण्यासाठी स्टेडियम ५ वाजताच फुल्ल झाले होते. पहिल्या दिवसाच्या तुलनेत शनिवारच्या सामन्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. यात लक्षणीय संख्या होती ती टेनिसपटू आणि पेसचे चाहते असलेले चिमुरडे आणि युवा वगार्ची. सामन्याला प्रारंभ होण्यापूवीर्पासून चिअर स्टिक्सच्या आवाजाच्या साथीने 'इंडिया... इंडिया' हा जयघोष सुरू होता. सामना सुरू होताच त्याला आणखी उधाण आले. भारतीय जोडी माघारली असताना प्रत्येक वेळी ‘कम आॅन इंडिया’, ‘कम आॅन पेस’, ‘कम आॅन विष्णू’ अशा घोषणांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत होते. आणि मुख्य पंचांनी माईकवरून सामना सुरू होण्याची घोषणा केली आणि स्टेडियममध्ये ..... साईलेन्स...(क्रीडा प्रतिनिधी)पेसचा खेळ पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचेआश्विन गिरमे : लिएंडरचा खेळ पाहून डोळ्याचे पारणे फिटले. तो ग्रेट खेळाडू आहे. प्रशांत सुतार : भारतीय संघाच्या पराभवाने मन नाराज झाले. पण दुसरीकडे पेसचा खेळ पाहायला मिळाले ते भाग्य.अभिषेक ताम्हाणे : पेस इज ग्रेट, खेळात हार-जीत असतेच, पेसला लाईव्हपाहणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. हिमांशू रोकडे : पेसचा खेळ पाहणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. रेशम रणदिवे : लिएंडर ग्रेट खेळाडू आहे. त्याचा खेळ पाहायला मिळणेसुद्धा महत्त्वाचे. कनिष्क पवार : पेसचा खेळ पाहायला मिळणे माझ्यासारख्या शाळकरी मुलालाही खूप महत्त्वाचे आहे. दीपाली निकम : हार व जीत खेळत असतेच. एक कोणतरी जिंकतो. पण आम्हाला पेसचा खेळ पाहायला मिळणे महत्त्वाचे आहे.मधुश्री देसाई : पेस हा जागतिक स्तरावरील ग्रेट खेळाडू आहे. पुण्यामध्ये तो खेळतोय हे खुप महत्त्वाचे आहे आणि त्याचा खेळ पहायला मिळतो हे आमचे नशिबच!मोहसिन शेख : लिएंडरचा खेळ खूप चांगला झाला. खेळात एक कोण तरी जिंकतो. आज त्याचा दिवस नव्हता. मालती पोटे : पेस ग्रेट आहे. त्याचा खेळ पाहायला मिळणे हे महत्त्वाचे आहे. त्याची जागतिकस्तरावर खूप मोठी क्रेझ आहे. प्रतिभा मुंढे : पेसला खेळताना पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. तो परत कधी पुण्यात खेळयला येणार...?मंशूचा परदेशी : लिएंडरचा पुण्यात खेळयतोय हेच महत्त्वाचे, अन्यथा तो एवढा मोठा खेळाडू पुण्यात कधी खेळणार. तो ग्रेट आहे.
लिएंडरच्या नावाने दुमदुमले स्टेडियम...
By admin | Published: February 05, 2017 4:05 AM