"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 05:47 PM2024-10-12T17:47:19+5:302024-10-12T17:47:53+5:30

कुस्तीपटू ते आमदार असा प्रवास करणारी विनेश फोगाट.

remember that hope is a powerful weapon even when all else is lost Congress MLA Vinesh Phogat's cryptic post | "सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट

"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट

कुस्तीपटू ते आमदार असा प्रवास करणारी विनेश फोगाट... वादामुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली माजी कुस्तीपटू विनेश फोगाट पहिल्याच राजकीय 'कुस्ती'त बाजी मारण्यात यशस्वी ठरली. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन विनेशने आमदार होण्याचा मान पटकावला. भारतीय कुस्तीतील हे एक मोठे नाव आता हरयाणा सरकारविरोधात आवाज उठवताना दिसेल. विनेशच्या जुलाना मतदारसंघातील जनतेने अनेक वर्षांपासून काँग्रेसविरोधी उमेदवाराला विजयी केले. २००५ पासून काँग्रेसला या जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र, विनेश फोगाटने आखाड्याबाहेरील कुस्तीत बाजी मारली आणि भाजपला मोठा झटका दिला. आता विनेशने एक क्रिप्टिक पोस्ट करुन सर्वांचे लक्ष वेधले.

विनेशने एक प्रेरणादायी पोस्ट केली आहे. "सर्व काही गमावले तरीही आशा हे एक शक्तिशाली शस्त्र आहे हे लक्षात ठेवा", असे या पोस्टमध्ये नमूद आहे. खरे तर हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेश फोगाट आणि तिचा सहकारी बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचा 'हात' धरला. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर विनेशसह तिच्या सहकारी पैलवानांनी गंभीर आरोप केले.


विनेश फोगाटला एकूण ६५,०८० मते मिळाली, तर भाजप उमेदवार योगेश कुमार यांना ५९,०६५ मतदान झाले. इंडियन नॅशनल लोक दलाचे सुरेंदर लाथेर १०,१५८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष बाब म्हणजे विनेशने आपल्या पहिल्याच निवडणुकीत ६,०१५ मतांनी विजय साकारला. दरम्यान, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला मोठा धक्का बसला होता. कुस्तीपटू विनेशने ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात भाग घेतला होता. तिने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, परंतु अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅमने वाढले अन् तिला अपात्र घोषित करण्यात आले.

Web Title: remember that hope is a powerful weapon even when all else is lost Congress MLA Vinesh Phogat's cryptic post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.