नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 हटवले. जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 हटवल्यावर आता तिथे चांगले खेळाडू घडतील, असे मत भारताची अव्वल बॉक्सर आणि राज्यसभा सदस्य मेरी कोमने म्हटले आहे.
याबाबत मेरी म्हणाली की, " जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावर आता खेळाडूंना केंद्र सरकारकडून चांगली मदत मिळेल. आता जम्मू-काश्मीरमध्ये खेळांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे चांगले खेळाडू घडण्यास मदत होईल. या साऱ्या गोष्टींचा खेळाडूंना फायदा होईल आणि ते देशाचे नाव उंचावण्यास मदत करतील."
कलम 370 हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय खूप विचारविनिमय करुन घेतल्याचं सांगितले. यामुळे देशातील दुसऱ्या राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकासाला गती मिळेल. राज्यात रोजगार, गुंतवणूक वाढेल स्थानिकांची प्रगती होईल अशा शब्दात मोदींनी भावना व्यक्त केली आहे.
या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी या निर्णयासाठी भरपूर आश्वासक आहे. अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजाआड होऊ शकत नाही. खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतात. गुंतवणूकीमुळे रोजगार, स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल असं त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानींचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू काश्मीरी जनतेचे सांत्वन करण्याची संधी सोडत नाहीत. पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि कर्णधार सर्फराज अहमदनंतर आता पाकच्या आणखी एका क्रिकेटपटूनं काश्मीरी जनतेचं सांत्वन करणारे ट्विट केले आहे.
आफ्रिदीनं हे कलम हटवणं म्हणजे काश्मीरी जनतेच्या हक्कावर गदा आणणे असं ट्विट केलं होतं. त्यावर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने आफ्रिदीला चांगलेच सुनावले होते. सोमवारी सर्फराजने एक विधान केले. तो म्हणाला, आम्ही पाकिस्तानी काश्मीरी नागरिकांच्या पाठिशी आहोत. अल्लाहने त्यांच्यावरील दु:ख लवकरच दूर करावे अशी प्रार्थना करतो." त्यात रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरची भर पडली आहे. त्यान एका दुखापतग्रस्त लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्याने लिहिले की," बलिदानाचा अर्थ तूम्ही सांगितला. तुमच्या स्वातंत्र्यासाठी मी प्रार्थना करतो."