ब्यूनस आयर्स: काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियामध्ये फुटबॉल चाहत्यांनी भर मैदानात राडा घातला होता. यामध्ये शेकडो चाहत्यांना जीव गमावावा लागला. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली. मात्र यावेळी, ठिकाण होते अर्जेंटिना आणि चाहत्यांनी हा गोंधळ स्टेडियमबाहेर घातला. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका स्थानिक सामन्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. जिम्नासिया वाय एस्ग्रिमा या संघाच्या काही पाठीराख्यांना स्टेडियममध्ये प्रवेशही करता आला नाही. यानंतर प्रेक्षकांनी गोंधळ घातला आणि या मोठ्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रबर बुलेट आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या गोंधळात एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची माहिती मिळाली. एक आठवड्याआधीच इंडोनेशियामध्येही फुटबॉल स्टेडियममध्ये अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"