शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कर्नाटकसमोर शेष भारत ‘ढेर’

By admin | Published: March 21, 2015 1:18 AM

मनिष पांड्येचे शानदार नाबाद शतक आणि श्रेयश गोपालने घेतलेली फिरकी याजोरावर बलाढ्य कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करताना शेष भारताचा २४६ धावांनी धुव्वा उडवला.

इराणी ट्रॉफी: निर्णायक शतक झळकावणारा मनिष पांड्ये ठरला सामनावीरबंगळुरु: मनिष पांड्येचे शानदार नाबाद शतक आणि श्रेयश गोपालने घेतलेली फिरकी याजोरावर बलाढ्य कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करताना शेष भारताचा २४६ धावांनी धुव्वा उडवला. कर्नाटकने एकूण सहाव्यांदा हे विजेतेपद पटकावताना विजयी ‘षटकार’ देखील नोंदवला.सामनावीर ठरलेल्या पांंड्येने १६४ चेंडुमध्ये १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १२३ धावा कुटत कर्नाटकला दुसऱ्या डावात ४२२ धावांची मजल मारुन दिली आणि शेष भारताला विजयासाठी ४०३ धावांचे कठीण आव्हान दिले. या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या शेष भारताचा डाव ४३.३ षटकांत अवघ्या १५६ धावांत संपुष्टात आला. केदार जाधवने एकाकी झुंज देताना संयमी ५६ धावा फटकावल्या. परंतु दुसऱ्या बाजूला एकही फलंदाज कर्नाटकच्या माऱ्यासमोर न टिकल्याने शेष भारताचा पराभव झाला.फिरकीपटू गोपालने अचूक मारा करत ३९ धावांत ४ बळी घेत शेष भारताच्या फलंदाजांना नाचवले. अभिमन्यू मिथूनने देखील त्याला चांगली साथ देताना ४० धावांत ३ बळी घेतले. एस. अरविंद आणि एच. शरथ यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.चौथ्या दिवशी ६ बाद ३४१ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना कर्नाटकने पांड्येच्या जोरावर ४००चा पल्ला पार केला. कर्णधार विनय कुमार (३८) ने छोटेखानी खेळी केली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरने आपला जलवा दाखवताना दुसऱ्या डावात कर्नाटकचा अर्धा संघ ८६ धावांत गारद केला. वरुण अ‍ॅरोन आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करताना शेष भारताचा डाव सुरुवातीपासूनच गडगडला. शरथ आणि मिथून यांनी शेष भारताच्या आघाडीच्या फळीला जबरदस्त धक्के देत त्यांची सुरुवातीलाच ३ बाद ८ अशी केविलवाणी अवस्था केली. यानंतर जीवनज्योत सिंग (३८) आणि कर्णधार मनोज तिवारी (२४) यांनी चौथ्या विकेट्साठी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने शेष भारतची ५ बाद ६५ अशा अवस्था झाली. यानंतर केदारने आक्रमक अर्धशतक झळकावताना शेष भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव १५६ धावांत आटोपला. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफल:कर्नाटक (पहिला डाव): सर्वबाद २४४ धावा.शेष भारत (पहिला डाव): सर्वबाद २६४ धावाकर्नाटक (दुसरा डाव): समर्थ त्रि. गो. ठाकूर ८१, अगरवाल झे. जाधव गो. अ‍ॅरोन २८, रेड्डी पायचीत गो. ओझा ३१, उथप्पा त्रि. गो. अ‍ॅरोन ६, नायर पायचीत गो. ओझा ८०, पांड्ये नाबाद १२३, गोपाल झे. नमन गो. गो. धवन ०, विनय झे. नमन गो. ठाकूर ३८, मिथून त्रि. गो. ठाकूर १०, अरविंद पायचीत गो. ठाकूर ४, शरथ झे.डोग्रा गो. ठाकूर ५. अवांतर - १६. एकूण: ११०.३ षटकांत सर्वबाद ४२२ धावा.गोलंदाजी: धवन २१-१-७४-१; अ‍ॅरोन २७-४-१३१-२; ठाकूर २९.३-६-८६-५; ओझा २८-३-१००-२; जाधव ४-०-१६-०; तिवारी १-०-६-०.शेष भारत (दुसरा डाव): जीवनज्योती झे. रेड्डी गो. शरथ ३८, चंद झे. उथप्पा गो. मिथून १, डोग्रा त्रि. गो. मिथून ०, ओझा झे. उथप्पा गो. मिथून ०, तिवारी गो. अरविंद २४, जाधव झे. रेड्डी गो. गोपाल ५६, यादव पायचीत गो. गोपाल १०, धवन पायचीत गो. गोपाल १०, ठाकूर त्रि. गो. गोपाल ५, अ‍ॅरोन नाबाद १०, ओझा धावबाद ०. अवांतर - २. एकूण: ४३.३ षटकांत सर्वबाद १५६ धावा.गोलंदाजी: विनय १२-२-३४-०; मिथून १०-२-४०-३; शरथ ६-१-१६-१; अरविंद ९.३-३-२५-१; गोपाल ६-०-३९-४.या विजेतेपदासह सलग तीन राष्ट्रीय विजेतेपद पटकावण्याचा अनोखा विक्रम करताना यंदा कर्नाटकने विजेतेपदांची ‘हॅट्ट्रीक’ नोंदवली. इराणी ट्रॉफी अगोदर कर्नाटकने यंदाच्या रणजी ट्रॉफी व विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेचे विजेतेपद देखील राखले आहे.शेष भारतचा अर्धा संघ ६५ धवांत परतल्यानंतर त्यांचा उरल्या सुरल्या आशा अवलंबून होत्या त्या महाराष्ट्राच्या केदार जाधववर. केदारने एकाकी झुंज देत सहजासहजी हार पत्करणार नसल्याचा इशारा देत आक्रमक प्रतित्त्युर दिले. केदारने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करीत ५६ धावा काढल्या. त्याने सहाव्या गडीसाठी जयंत जाधव सोबत ४८ धावा रचल्या, ज्यात केदारचा वाटा ३८ धावांचा होता.