टीम इंडियाचा कर्णधार धोनी या वेळापत्रकावर समाधानी आहे. पाकवर विजयानंतर प्रसन्न मुद्रेत असलेला धोनी म्हणाला, ‘‘तिरंगी मालिकेनंतर खेळाडूंना १० दिवसांची विश्रांती सुखावणारी ठरली. आॅस्ट्रेलियाच्या साडेतीन महिन्यांच्या दौऱ्यातील थकवा दूर करता आला. या दौऱ्यातील पहिला टप्पा फारच खराब राहिला. संघातील काही महत्त्वाचे खेळाडू जखमांनी त्रस्त होते. याचा विपरीत परिणाम विश्वचषकाआधी खेळाडूंच्या मनोवृत्तीवर दिसत होता; पण विश्वचषकाआधी मिळालेल्या ब्रेकमुळे माहोल बदलला.’’ या संदर्भात धोनी हसत-हसत म्हणाला, ‘‘आम्ही सर्व जण क्रिकेटपासून दूर होतो. सर्वच जण आपापली क्रिकेट किट लॉकरमध्ये ठेवून सहलीला निघालो होतो. विश्वचषकाआधी सर्वांनी जोरदार तयारी करून पाकवर पहिल्याच सामन्यात आकर्षक विजय साजरा केला. टीम इंडिया आता विजयपथावर परतली आहे.’’ यामुळे मागच्या चुका सुधारण्यास वाव मिळाला. पुढच्या सामन्यात चुकांची दुरुस्ती मोलाची ठरणार आहे.’’ विश्वचषकाच्या वेळापत्रकावर हे वेगवेगळे विचार पुढे आले असतील; पण यातील योग्य विचार कोणता, हे २९ मार्च रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात स्पष्ट होईल. - धोनी (कर्णधार भारत)
विश्रांती ‘टॉनिक’प्रमाणे : धोनी
By admin | Published: February 19, 2015 2:27 AM